माळशिरस तालुका बार असोसिएशनच्या सहसचिवपदी ॲड. आकाश पाटील यांची बिनविरोध निवड.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुका बार असोसिएशनच्या सहसचिव पदी माळशिरस शहरातील उद्योजक युवा वकील ॲड. पै. आकाश मारूतीराव पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
माळशिरस तालुका वकील संघटनेची चुरशीची, अटीतटीची व रंगदारदार निवडणूक असते. माळशिरस वकील संघटनेमध्ये अनेक वकील सदस्य आहेत. यामध्ये जुने अनुभवी वकील ठरवतात, तेच बार असोसिएशनचे पदाधिकारी होत असतात. मात्र, अलीकडच्या काळामध्ये नवतरुण वकिलांची फौज तयार झालेली आहे. ॲड. आकाश पाटील यांनी पहिल्यांदाच वकील संघटनेच्या निवडणुकीत सहभाग घेतला आणि पहिल्यांदाच बिनविरोध सहसचिव होण्याचा बहुमान मिळाला असून माळशिरस तालुक्यामध्ये तरुण वयात सहसचिव झालेले ॲड. आकाश पाटील हे पहिलेच आहेत. ॲड. आकाश पाटील यांनी सर्व शिक्षण पुणे येथे पूर्ण केले आहे. माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष डॉ. मारुतराव पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. ॲड. आकाश पाटील यांची बार असोसिएशनच्या सहसचिव पदी बिनविरोध नियुक्ती झाल्यानंतर समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त तीन दिवसांची परिषद संपन्न
Next articleवेळापूरचे माजी उपसरपंच पांडुरंग मंडले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here