माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी व अटल प्रतिष्ठान यांच्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात व जळभावी गावचे युवा नेते पत्रकार स्वप्निल कुमार राऊत यांचा वाढदिवसानिमित्त हार घालून फेटा बांधून व पेढा भरून सत्कार करण्यात आला.
यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य सोलापूर जिल्ह्याचे संघटक ज्येष्ठ नेते के. के. पाटील, ओबीसीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पार्टीचे तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष व डोंबाळवाडी गावचे सरपंच लक्ष्मण उर्फ पिनुशेठ माने, जळभावी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास चोरमले, जळभावी ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुभाष धाईंजे, माजी सरपंच नंदकुमार धाईंजे, युवराज बोडरे, कॉन्ट्रॅक्टर आण्णासो सुळ, सुप्रसिद्ध छायाचित्रकार बाळराजे सुळ पाटील, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दादासाहेब खरात यांच्या मातोश्री सौ. द्वारकाबाई कृष्णा खरात मोटेवाडी, माळशिरस या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. खरात परिवार यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राजकारण समाजकारण यामध्ये आपले नाव कोरलेले आहे. दादासाहेब खरात यांचे रावसाहेब खरात हे बंधू आहेत. राम-लक्ष्मणाच्या जोडीने अहोरात्र कष्ट करून प्रपंच सुस्थितीत आणलेला आहे. द्वारकाबाई आणि कृष्णा या आई-वडिलांनी अफाट कष्ट केलेले होते त्यांचे चीज दादासाहेब व रावसाहेब यांनी करून समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. रावसाहेब शेतीमध्ये काम करीत आहेत, तर दादासाहेब यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष पद आहे.

जळभावी गावचे युवा नेते स्वप्निल कुमार राऊत यांचे बारावी शिक्षण झालेले आहे. बाळासाहेब सिताराम राऊत व सौ. वैशाली बाळासाहेब राऊत यांनी स्वप्नीलकुमार, धीरज कुमार व कौस्तुभकुमार अशा त्रिमूर्ती मुलांवर चांगले संस्कार करून समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. बाळासाहेब राऊत विदर्भ कोकण ग्रामीण बँक, इस्लामपूर येथे कार्यरत आहेत. वैशाली राऊत विणकाम करून आपल्या संसाराला हातभार लावत आहेत. स्वप्नीलकुमार यांनी शिक्षणाबरोबर गेल्या तीन वर्षापासून पत्रकारितेला सुरुवात केलेली आहे. पत्रकारिता करीत असताना सर्वसामान्य जनतेच्या हिताचे, समाजामध्ये चालू घडामोडींवरवर बारीक लक्ष ठेवून पत्रकारिता सुरू आहे. कमी वयामध्ये पत्रकारिता क्षेत्रांमध्ये गगन भरारी घेतलेली आहे. दोन्ही युवक एक राजकारणी दादासाहेब आणि एक पत्रकार स्वप्नीलकुमार अशा दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने भारतीय जनता पार्टी अटल प्रतिष्ठान व जळगावी ग्रामस्थांच्यावतीने सन्मान संपन्न झालेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng