माळशिरस तालुका शिक्षक पतसंस्थेवर अध्यक्षपदी आप्पा खरात तर, उपाध्यक्षपदी आण्णा मगर

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडी नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये स्वाभिमानी परिवाराकडून अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीत आप्पा लक्ष्मण खरात रा. कोंडबावी, शाळा रेडे यांनी गुरुसेवा परिवाराच्या प्रदीप अवताडे रा. फळवणी यांचा 12 : 3 तर उपाध्यक्ष पदासाठी स्वाभिमानी परिवाराच्या आण्णासाहेब गोरख मगर रा. मगराचे निमगाव यांनी गुरुसेवा परिवाराच्या लक्ष्मण तुकाराम वाघ रा.यशवंतनगर यांच्यावर 12:3 नेच दणदणीत विजय मिळविला.

नुकत्याच संपन्न झालेल्या तालुका पतसंस्थेच्या निवडणुकीत अनेक समविचारी संघटनांनी एकत्र येऊन बांधलेल्या स्वाभिमानी परिवाराने सत्ताधारी आणि प्रस्थापित गुरु सेवा परिवारावर 12:3 अशी एकतर्फी मात केली होती. माळशिरस तालुक्यातील कर्मचाऱ्यांची सर्वात जास्त उलाढाल असणारी संस्था म्हणून तालुका शिक्षक पतसंस्थेचा नावलौकिक आहे. 820 सभासद असणाऱ्या तालुका शिक्षक पतसंस्थेची सुमारे 75 कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल आहे. शिक्षक संघटनांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेमध्ये पतसंस्थेवरील वर्चस्व निर्णायक मानले जाते. पतसंस्थेवर एकतर्फी विजय मिळवून स्वाभिमानी परिवाराने जिल्हा पतसंस्थेच्या निवडणुकीवेळी माळशिरस तालुक्यातील मिळालेली आघाडी तालुका पतसंस्थेच्या निवडणुकीतही कायम ठेवल्याने गुरु सेवा परिवार दोन्ही निवडणूकीत पिछाडीवर राहिल्याचे दिसून आले.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीमध्ये पॅनल प्रमुख दिलीप ताटे यांच्या नेृत्वाखाली संचालक मंडळासह स्वाभिमानी परिवाराच्या विविध नेतेमंडळींचे महत्वाचे योगदान राहिले. त्यामध्ये माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), शिक्षक समिती, जुनी पेन्शन संघटना, दिव्यांग शिक्षक संघटना, आदर्श शिक्षक समिती, स्वाभिमानी जय विजय, एकल शिक्षक संघटना, शिक्षक भारती, पदवीधर शिक्षक संघटना यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.

अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीनंतर पतसंस्थेकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल सर्व सभासदांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. राऊत यांच्या निरीक्षणाखाली अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांची पुण्यतिथी संपन्न
Next articleअकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळातील कोणाला संधी तर कोणाला डच्चू ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here