माळशिरस तालुक्याचा लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या तिन्ही सभागृहात एकाच वेळी आवाज घुमतोय.

माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विकास वाटेवरून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते यांची दमदार वाटचाल सुरू

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विकास वाटेवरून माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे दमदार आमदार राम सातपुते माळशिरस तालुक्याला लाभलेल्या या तीनही लोकप्रतिनिधींची दमदार वाटचाल सुरू आहे. माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये लोकसभा, विधान परिषद, विधानसभा तीनही सभागृहात एकाच वेळी आवाज घुमतोय‌. तालुक्याचे प्रलंबित प्रश्नांना वाचा फुटते आहे.

विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये लोकसभा, विधानपरिषद, विधानसभा तीनही सभागृहांमध्ये काम करून तालुक्यातील, जिल्ह्यातील व राज्यातील अनेक प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे. उर्वरित प्रलंबित प्रश्न सुटलेले आहेत, तर काही सुटण्याच्या मार्गावर आहेत. विजयसिंह मोहिते पाटील खासदार असताना पाठपुरावा करून सुरू असणारी कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यामध्ये पाठपुरावा करून अनेक कामे मार्गी लागलेली आहे. त्यामध्ये लोणंद-पंढरपूर रेल्वे मार्ग, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग, श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, म्हसवड-अकलूज-टेंभुर्णी राज्य मार्ग, सातारा-म्हसवड-पंढरपूर अशी कामे मार्गी लागलेली आहेत. मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन सुद्धा मार्गी लागण्याच्या मार्गावर आहेत. विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला मान्यता दिलेली होती. सदरची योजना मार्गी लावण्याकरिता विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील प्रयत्नशील आहेत. नीरा-देवघर प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी आमदार राम सातपुते यांनी अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. मोठ्या कामाबरोबर रस्ते, लाईट, पाणीपुरवठा योजना, समाज मंदिर सभामंडप, स्ट्रीट लाईट, हायमास्ट दिवा, ओढा, नाले खोलीकरण, सरळीकरण, लघुपाटबंधारे विभागाच्या मार्फत बंधाऱ्यांची नवीन बांधणी, दुरुस्तीची कामे माळशिरस तालुक्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, खासदार फंड, आमदार फंड अशा विविध योजनेतून माळशिरस तालुक्यामध्ये भरघोस प्रमाणात निधी उपलब्ध करून अनेक कामे मार्गी लागलेले आहेत, तर काही कामे सुरू आहेत. घरकुल व जागेचा प्रश्न, विंधन विहिरी असे अनेक प्रश्न लोकप्रतिनिधी वेळोवेळी जनतेच्या व्यक्तिगत व सार्वजनिक अडचणीत सोडवीत आहे. जनता दरबार व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका सुरुच आहेत.

माळशिरस तालुक्यातील मतदार व जनतेने पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखाचे लीड व भारतीय जनता युवा मोर्चाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना एक लाखाच्यावर मताधिक्य देऊन विजयी केलेले आहे. या दैदिप्यमान विजयामध्ये मोहिते पाटील परिवार यांचा सिंहाचा वाटा असल्याने युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने विधान परिषदेची आमदारकी दिलेली आहे. माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधी एकाच वेळी तीनही सभागृहात आवाज उठवत आहेत. केंद्रामध्ये भाजपचे सरकार असल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कामे सहज होत आहेत. मात्र, महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधी महाविकास आघाडी सरकार असल्याने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांना संघर्ष करून आवाज उठवून सरकारला धारेवर धरून आक्रमक भूमिका घेऊन कामे करून घ्यावी लागत आहे.

माळशिरस तालुक्याला लाभलेले राम, लक्ष्मण,भरत या त्रिदेव लोकप्रतिनिधींनी माळशिरस तालुक्यांमध्ये विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे. विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विकास वाटेवरून तिनही लोकप्रतिनिधींची दमदार वाटचाल सुरू असल्याने माळशिरस तालुक्यातील मतदार व जनता समाधान व्यक्त करीत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअपंग संघटनेचे नेते गोरख जानकर यांचेकडून तरंगफळ गाव कामगार तलाठी कार्यालयास खुर्च्या भेट
Next articleज्येष्ठ नेते बाबाराजे देशमुख यांच्या शुभहस्ते नातेपुते नगरपंचायतच्या स्वच्छ सुंदर उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे उद्घाटन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here