भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते यांच्याकडे कर्नाटक राज्याचे प्रभारीपदी नियुक्ती.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते यांच्याकडे कर्नाटक राज्याचे प्रभारी पदी नियुक्ती केलेली आहे त्यामुळे माळशिरस तालुक्याची लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची तोफ कर्नाटकमध्ये धडाडणार आहे.
संघर्ष योद्धा प्रतिकूल परिस्थितीत निष्ठा प्रामाणिकपणा व ध्येय या जोरावर आमदार राम सातपुते यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात राजकारणाला सुरुवात केलेली होती. कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करून विद्यार्थी वरिष्ठ नेत्यांमध्ये लोकप्रियता मिळविलेली होती. युवकांचे संघटन कौशल्य, पहाडी आवाज ,भाषेवर प्रभुत्व, विषयाची मांडणी, आक्रमकता, अशा अनेक गुणांमुळे त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळालेली होती या संधीचे सोने करून आठ नऊ वर्ष नेत्यांनी टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि पडद्यामागील चाणक्य श्रीकांत भारतीय यांनी माळशिरस विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या जागेवर विधानसभेची उमेदवारी दिली महाराष्ट्र राज्याचे चे माजी उपमुख्यमंत्री विकास रत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने माळशरस विधानसभेचे आमदार होण्याचा बहुमान ऊसतोड मजुराच्या चा मुलगा संघर्षयोद्धा राम सातपुते यांना मिळाला.

मतदार संघात जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेळा रस्त्यावर येऊन संघर्ष केलेला आहे.
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्याशी संपर्क ठेवून वेळोवेळी पक्षवाढीसाठी सातत्याने मार्गदर्शन आमदार राम सातपुते घेत असतात त्यांना नेहमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भारतीय मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या, चाणक्य श्रीकांतजी भारतीय अशा अनेक नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन अंधार राम सातपुते यांची राजकीय वाटचाल सुरू आहे वरिष्ठ नेतृत्व यांनी त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. सध्या त्यांच्याकडे कर्नाटक राज्याचे प्रभारी पद दिलेली आहे.

कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे अशा महत्वपूर्ण राज्याची जबाबदारी आमदार राम सातपुते यांच्याकडे दिलेली असल्याने आमदार राम सातपुते वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेले आहेत. आमदार राम सातपुते कर्नाटक राज्यामध्ये जास्तीत जास्त युवा मोर्चा च्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात लोकांपर्यंत पोहोचविणे करता प्रयत्न करतील अनेक सभा मोर्चा मेळावे अशावेळी आमदार राम सातपुते यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार असल्याने माळशिरस विधानसभा मतदार संघातील जनतेची मान अभिमानाने उंचावेल यामुळे कर्नाटक राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक स्तरातून त्यांचा सन्मान होऊन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng