माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी पशुखाद्य कारखाना अंतिम टप्प्यात

बनशंकरी ऍग्रो कॅटल फीड कारखान्यात गोळी पेंड, मका भरडा, गहू भुसा, दर्जेदार उत्पादन करून थेट शेतकऱ्यांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहे.

नातेपुते ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या भागांमध्ये कारूंडे गावच्या हद्दीत मोरोची धर्मपुरी कारुंडे गावच्या सीमेवर इंद्रजीत व रणजित रुपनवर पाटील यांचा शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय आहे. या दुग्ध व्यवसाय वाढीसाठी दर्जेदार पशुखाद्याची आवश्यकता असते. शेतकऱ्यांची गरज ओळखून बनशंकरी ऍग्रो कॅटल फिड कारुंडे व्यवसाय सुरू केलेला असून सर्व मशनरी अद्यावत झालेली असून पूर्णत्वाकडे वाटचाल आहे.

कारुंडे गावातील सर्वसामान्य शेतकरी श्री. बाळकृष्ण बापूराव रुपनवर पाटील आणि सौ. उषाताई बाळकृष्ण रुपनवर पाटील यांनी शेतीवर उदरनिर्वाह करून त्यांनी इंद्रजीत आणि रणजीत या दोन मुलांना उच्च शिक्षीत केले आहे. दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट परिश्रम पाहून कठीण आर्थिक परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केलेले आहे. इंद्रजीत बी. कॉम. डिग्री घेतलेली आहे तर, रणजितने बीएससी ऍग्री करून एमबीए पूर्ण केलेले आहे. एच आर मार्केटिंगचा कोर्ससुद्धा पूर्ण केलेला आहे. इंद्रजीत आणि रणजीत यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या पाठीमागे न लागता आपल्या शिक्षणाच्या ज्ञानाचा कुटुंबाची प्रगती व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राम लखन बंधूंनी शेतकऱ्यांना पशुधन वाढविण्याकरता लागणारे पशुखाद्य दर्जेदार व वाजवी किमतीमध्ये निर्मिती करण्याचा कारखाना उभारण्यास सुरुवात केलेली आहे.

बनशंकरी ऍग्रो कॅटल फिड कारखान्यांमध्ये गोळी पेंड, मका भरडा, गहू भुसा असे पशुखाद्य तयार होणार आहे. 45 किलो भुसा भरडा, पेंन्ड 50 किलो व 59 किलो मध्ये तयार करणार आहेत. अद्यावत मशनरी उभारलेली आहे. तासाला दोन टन व दिवसाला 50 टन अवरेज पशुखाद्य तयार होणार आहे. सर्व ऑटोमॅटिक मशनरी आहेत. रणजीत आणि इंद्रजीत यांचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना थेट पशुखाद्य पुरविण्याचा मानस आहे. होलसेल करणाऱ्या लोकांनासुद्धा एजन्सी देणार आहेत. मागणीप्रमाणे पुरवठा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्यवसायांमध्ये जास्तीत जास्त फायदा कसा होईल, यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. बनशंकरी ऍग्रो कॅटल फिडचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.

कारखाना उभारणीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे व राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळालेले आहे. काम अंतिम टप्प्यात आहे. थोड्याच दिवसात दत्ता मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार परिवारातील सदस्यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्याचा मानस आहे, असे इंद्रजीत व रणजीत रुपनवर पाटील यांनी माहिती देताना सांगितले. शेतकरी व ग्राहक विक्रेते यांनी 70 57 54 8008 व 86 69 33 0003 नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन रुपनवर पाटील यांनी केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांची पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक संपन्न
Next articleगोरडवाडी गावच्या कै हौसाबाई गोरड यांचे वृध्दापकाळाने झाले निधन….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here