माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील यांच्या विश्वासू व निष्ठावान युवा कार्यकर्त्यांची खरी निष्ठा

बंद पडलेला श्री शंकर सहकारी साखर कारखाना चालू करण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक भूमिका ठेवल्याने कारखाना सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्याला अच्छे दिन

सदाशिवनगर ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन भाजपचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती जलनायक अर्जुनसिंह मोहिते पाटील, यांचे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक कार्यकर्ते आहेत. मोहिते-पाटील यांचा विश्वासू व निष्ठावान माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील युवा कार्यकर्ता, सदाशिवनगर ग्रामपंचायतीचे सदस्य विष्णू भोंगळे युवा कार्यकर्ता यांची खरी निष्ठा पहावयास मिळत आहे. श्री शंकर सहकारी साखर कारखाना बंद पडलेला चालू करण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक भूमिका ठेवलेली होती. त्यामुळे विष्णू भोंगळे या कार्यकर्त्याला कारखाना सुरू झाल्यानंतर अच्छे दिन आलेले आहेत.

माळशिरस तालुक्याच्या श्री शंकर सहकारी साखर कारखाना अनेक गावांचे आर्थिक स्तोत्र निर्माण करून उद्योग व्यवसायला चालना देणार कारखाना आहे. सदरचा कारखाना बंद अवस्थेत असताना शासनाने खाजगी तत्त्वावर सुरु करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. अशा कठीण परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सभासदांनी न्यायालयीन भूमिका सुरू केलेली होती. सदरचा कारखाना सहकारी ठेवण्यामध्ये विजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांना यश आलेले होते. त्यावेळेस विष्णू भोंगळे सोशल मीडियावर प्रसारमाध्यमांचे काम सकारात्मक करीत होते. कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा व कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेमध्ये सकारात्मक भूमिका ठेवलेली होती. विष्णू भोंगळे यांना कायम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांची मोलाची साथ मिळत आहे. विष्णू भोंगळे यांनी मोहिते पाटील परिवार यांचा विश्वास संपादन केलेला आहे. विशेष करून जयसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी विष्णू भोंगळे यांना आधार दिलेला आहे. विष्णू भोंगळे यांच्या पत्नी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये नोकरीस आहेत तर स्वतः शिवामृत दूध संस्थेची एजन्सी घेऊन उदरनिर्वाहाचा व्यवसाय सुरू आहे.

विष्णू भोंगळे यांचा सुसंस्कृत व मनमिळावू स्वभाव, अडचणीतील लोकांना सहकार्य करीत असल्याने अनेक लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. सदाशिवनगर कारखाना पंचक्रोशीतील पुरंदावडे, येथील मांडवे, मारकडवाडी, तामशिदवाडी, फोंडशिरस, जाधववाडी, भांबुर्डी, कण्हेर, मेडद, मांडकी, इस्लामपूर अशा अनेक गावांचा दैनंदिन नागरिकांचा संबंध येत असतो. अशावेळी मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक व विश्वासू म्हणून विष्णू भोंगळे यांच्याकडे लोक येत असतात. अशावेळी मोहिते पाटील यांच्याशी संपर्क करून अनेकांची कामे विष्णू भोंगळे करीत असतात. मोहिते पाटील यांचा विश्वास संपादन केलेला असल्याने कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाते. श्री शंकर सहकारी साखर कारखान्यातील सभासद कामगार यांच्या समस्या मोहिते पाटील यांच्या पर्यंत पोचवण्याचे काम केले जाते. विष्णू भाऊ भोंगळे यांचा परिसरातील जनतेशी थेट संपर्क येत असल्याने कारखान्याचे सभासद करण्यामध्येही विश्वासात घेतले जात आहे. विष्णू भोंगळे यांची परिस्थिती बेताची आहे मात्र, मनाची श्रीमंती असल्याने अनेक युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ मंडळी विष्णूभाऊ यांच्या संपर्कात आहेत.
मोहिते पाटील परिवारातील सर्व सदस्यांचा विश्वास संपादन केलेले माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील युवा कार्यकर्ता म्हणून विष्णू भाऊ भोंगळे सुपरिचित आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवाघोलीत सेवानिवृत्त सनदी अधिकारी व सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
Next articleमेडद सेवा सोसायटीवर स्थापनेपासून पहिल्यांदाच मोहिते पाटील गटाचा झेंडा फडकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here