जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, यांच्यासह मोहिते पाटील समर्थक यांचा धुरळा उडाला.
माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास पाटील, विद्यमान सरपंच पोपट बोराटे यांच्यासह अनेक दिग्गजांचा सुपडा साफ.
फोंडशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यात पश्चिम भागात सर्वात मोठी असणारी शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित तामशिदवाडी या सोसायटीच्या निवडणुकीत तीन पॅनल आमने सामने उभे होते. 13 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी मधुकर पाटील यांच्या गटाच्या नऊ सदस्यांनी दैदिप्यमान विजय संपादन करून माळशिरस तालुक्याच्या सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर पाटील हिंदकेसरी ठरलेले आहेत. माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्ह्याचे नेते संघटक सरचिटणीस शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते. तर प्रचाराच्या वेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुभाष कुचेकर, शिवामृतचे व्हाईस चेअरमन सावता ढोपे, ज्येष्ठ नेते हनुमंतराव पाटील, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी गोरे, बाणलींग विद्यालय स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन हनुमंतराव कुंभार, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संतोष महामुनी यांच्यासह मोहिते पाटील यांच्या अनेक दिग्गज समर्थकांचा धुरळा उडालेला आहे. तर तिसऱ्या पार्टीचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुदास पाटील, विद्यमान सरपंच पोपट बोराटे, संचालक विलास आद्रट, यांच्यासह अनेकांचा सुपडा साफ झालेला आहे.
शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित तामशिदवाडी या सोसायटीच्या निवडणुकीत 2676 मतदारांपैकी 1572 मतदाराने मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी 58.74 झालेली होती. निवडणुकीत तीन पॅनल आमने-सामने होते. मात्र एकच पॅनल सत्तेत येण्याची शक्यता बारामती झटका न्यूज चॅनलने सभासदांचा कानोसा घेऊन बातमी दिली होती.

सर्वसाधारण कर्जदार गटात बोडरे उमाजी महादेव 517, बोराटे मुक्ताजी महादेव 375, चव्हाण बापू विठोबा 430, कदम हनुमंत शंकर 359, कदम केशव बाळू 478, कदम विष्णू साहेबराव 477, खुळे मारुती एकनाथ 415, कोडलकर संजय नारायण 397, मारकड आनंदा तुकाराम 502, मारकड नामदेव तुकाराम 474, मारकड सदाशिव संभू 470, मोटे बाबासो विठ्ठल 481, नरूटे पोपट दौला 350, शेंडे भानुदास अण्णा 422, वाघमोडे आदेश सोपान 537, वाघमोडे आनंदा ज्ञानदेव 492, वाघमोडे भिमराव नारायण 363, वाघमोडे खंडू पांडुरंग 519, वाघमोडे महादेव नाना 359, वाघमोडे रामदास संभाजी 495, वाघमोडे शामराव अर्जुन 479, वाघमोडे सुभाष एकनाथ 355, वाघमोडे सुखदेव महादेव 462, वाघमोडे तानाजी पांडुरंग 375, असे 24 उमेदवार उभे होते.
महिला प्रतिनिधी गटात भाळे नंदाबाई बापू 485, धायगुडे यशोदा पोपट 387, सरगर पाटील वनिता दत्तात्रय 345, वाघमोडे इंदुमती मारुती 494, वाघमोडे ताराबाई रामदास 502, वाघमोडे रुक्मिणी अंकुश 411 अशा सहा महिला उमेदवार होत्या.
अनुसूचित जाती जमाती गटात भोसले हरिदास अंकुश 580, भोसले नाना सदाशिव 355, ढोबळे मल्हारी बापू 556 असे तीन उमेदवार उभे होते.
भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात
वाघमोडे आनंदराव आबाजी 411, वाघमोडे दत्तात्रय भानुदास 557, वाघमोडे सुनील भालचंद्र 555, असे तीन उमेदवार उभे आहेत.
इतर मागास प्रवर्ग गटात गोरे कैलास किसन 528, गोरे शिवाजी संपत 373, शेंडे आनंता यशवंत 526 असे तीन उमेदवार उभे होते.
प्रत्येक गटाचे 13 उमेदवार असे एकूण 39 उमेदवार उभे आहेत. मतदान शांततेत पार पडलेले आहे. अकलूज सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी यशस्वी कोरे यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य संस्थेचे सचिव जालिंदर वाघमोडे यांनी केले. नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.
मधुकर पाटील यांनी तळागाळातील सर्वसामान्य मतदारांना समवेत घेऊन पॅनल उभा केलेला होता भानुदास पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र होते. मात्र, सोसायटीच्या निवडणुकीत स्वकीय यांच्याकडूनही झालेला होता. मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक पूर्ण ताकतीने निवडणुकीत उतलेले होते. मोहिते पाटील समर्थकांचा धुरळा उडवून दिलेला असून स्वकीयांचा सुपडा साफ केलेला आहे. फोंडशिरस पंचक्रोशीत किंगमेकर माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री धुळदेव पाणी वापर संस्थेचे चेअरमन मधुकर भाऊ पाटील किंगमेकर ठरलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng