माळशिरस तालुक्यातील खताचा काळाबाजार बंद करून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना चाप बसणार – अजितभैया बोरकर.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात खत दुकानदारांकडून काळाबाजार सुरू असून कृत्रिम तुटवडा दाखवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना स्वाभिमानी स्टाईलने भूमिका घेऊन चाप बसणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष तथा आंदोलन वीर अजितभैया बोरकर यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले. माळशिरस तालुक्यामध्ये अनेक खत विक्रेते शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दराने युरिया खत विकत घेत आहेत. खतांच्या वेगवेगळ्या किंमती समोरचा शेतकरी कसा आहे, यावर ठरत आहे. माळशिरस तालुक्यात कृत्रिम युरिया खताची टंचाई दाखवली जात असून चढ्या दराने विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे‌ तालुक्यातील ठोक खत विक्रेते काळ्या बाजाराने युरिया खत मोठ्या प्रमाणावर विक्री करीत आहेत. अशा बेकायदेशीर खतांचा काळाबाजार करणाऱ्या व चढ्या दराने युरिया खताची विक्री करणाऱ्या दुकानदारांना स्वाभिमानी स्टाईलने चाप बसणार असल्याचे अजितभैया बोरकर यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान होत आहे. बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याचा माल आल्यानंतर कमी दराने कवडीमोल किंमतीत विकावा लागत आहे. अनेक वेळा हातातोंडाला पिके आलेली असताना अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ अशा संकटांना बळीराजाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व संकटावर मात करून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा अडचणीच्या काळात शेती करण्याकरता युरिया खताची आवश्यकता असते. काही वेळेला दुकानदार लिंकिंग करून नको असणारे खत शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. युरिया खताचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करून विक्री करीत आहेत. काही दुकानदार शेतकऱ्यांना चढ्या दराने युरिया देत आहेत. या सर्व गोष्टींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.

रात्री-अपरात्री वाहनांमधून युरियाची वाहतूक होत असते, अशावेळी जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुन्हा लहानपणाची 26 जानेवारी शाळेच्या अंगणात उतरावी.
Next articleमहाळुंग श्रीपुर नगरपंचायत वर मोहिते पाटील यांनी कलम केलेल्या कमळाची सत्ता नको, निष्ठावान भाजपच्या मतदारांचा सुर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here