माळशिरस तालुक्यातील गुरसाळे ग्रामपंचायतची फेर मतमोजणी घेण्यात यावी – संतोष पाटील.

मोहिते पाटील पुरस्कृत दक्षिणमुखी श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनल गुरसाळे यांची तहसीलदार माळशिरस यांच्याकडे हरकत प्राप्त झाली

गुरसाळे ( बारामती झटका )

गुरसाळे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीची थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची निवडणूक होऊन मतमोजणी झालेली होती. सदरच्या मतमोजणीवर मोहिते पाटील पुरस्कृत दक्षिणमुखी श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनल गुरसाळे यांच्यावतीने श्री संतोष माणिक पाटील उमेदवार ( वार्ड क्र. 2) प्रतिनिधी व इतर यांच्यावतीने ॲड. आर. बी. लवटे यांच्यामार्फत माळशिरसचे तहसीलदार यांच्याकडे हरकत दाखल केलेली आहे.

सदरच्या हरकतीमध्ये मौजे गुरसाळे ता. माळशिरस येथील मतमोजणी दि. 20/12/2022 रोजी झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व माळशिरस तालुक्यातील निवडणुकीमधील गावांची मतमोजणी माळशिरस येथील नवीन शासकीय धान्य गोदाम म्हसवड रोड माळशिरस येथे झालेली आहे. सदर वरील विषयास अनुसरून मौजे गुरसाळे गावची मतमोजणी दुसऱ्या टप्प्यामध्ये सकाळी 09.30 चे दरम्यान होणार आहे, असा मेसेज गावातील गाव कामगार तलाठी यांनी गावातील सर्व उमेदवारांना पाठवलेला होता‌.

सदर ठरले प्रमाणे आम्ही सर्वजण 09.30 चे दरम्यान मतमोजणी केंद्रावर वेळेवर आलो होतो. परंतु त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा असल्याने तेथून सदर ठिकाणी पोहोचण्यास थोडा कालावधी गेला. सदर मतमोजणीवेळी दक्षिण मुखी श्री काळभैरवनाथ पॅनल गुरसाळे यांचे सध्या उभे असलेले उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी कोणीही नसल्यामुळे त्यांनी अतिशय घाई करून गडबडीत आम्हाला कोणतीही सूचना अगर पूर्वकल्पना दिली नाही.

सदर मतमोजणीवेळी आमच्या पॅनलची चिन्हे बॅट, फॅन, कढई व कपबशी या चिन्हाची मते विरोधी पार्टी यांना ग्राह्य धरली व तसा निकाल निवडणूक अधिकाऱ्यांनी अतिशय घाई गडबडीत सादर केलेला आहे. त्यामुळे लोकांना सत्य काय आहे, ते कळू शकणार नाही. त्यामुळे सदर निकाल हा बेकायदेशीर, चुकीचा व बोगस धरण्यात येऊ नये व पुन्हा एकदा सर्वांसमक्ष योग्य पद्धतीने व काटेकोरपणे मतमोजणी करून त्याचा न्यायनिवाडा करण्यात यावा, ही आमची रीतसर हरकत आहे. असा हरकती अर्ज वकील व हरकतदार यांच्या स्वाक्षरीने तहसील कार्यालय माळशिरस येथे देण्यात आलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजुनी पेंशन मागणीसाठी नागपूर विधानभवनावर लाखों कर्मचाऱ्यांचा धडकला मोर्चा.
Next articleExpanding Competence in Information Solutions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here