रोजगार सेवकांचे थकित मानधन त्वरीत मिळावे, यासह अनेक मागण्यांचा समावेश.
माळशिरस ( बारामती झटका )
राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी नोकरीत घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक युनियन माळशिरस संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार तुषार देशमुख तसेच गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांना देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेने राज्यभर दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी महात्मा गांधी जयंती दिवशी ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या मान्य करण्यात याव्यात. तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्यापर्यंत ग्रामरोजगार सेवक यांच्या मागण्या पोहोचवण्यात याव्यात, असे माळशिरस ग्रामरोजगार सेवक युनियनच्या वतीने करण्यात आले.
सदर निवेदनामध्ये पुढील मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत –
१) ग्रामरोजगार सेवक यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे.
२) दर महा मासिक वेतन निश्चित लागू करण्यात यावे.
३) रोजगार सेवक यांचे मानधन वैयक्तिक बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे.
४) टी.ए.डी.ए. व प्रवास भत्ता मिळण्यात यावा.
५) चालूचे मानधन एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांचे रोजगार सेवक यांचे मानधन त्वरित जमा करण्यात यावे.

सदर निवेदन देताना नितीन भागवत, सुनिल मोटे, सर्जेराव लोखंडे, गणेश सपताळे, संजय मोहीते, संजय हुलगे, किरण काळे, सखाराम सोरटे, विठ्ठल मदने, दादासाहेब बोडरे , राजु हुलगे, राहुल गोडसे, पोपट तोरणे, दादासाहेब बागाव आदींसह ग्रामरोजगार सेवक कोरोना नियमाचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng