माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील ग्रामपंचायत सदस्यांचे धक्कादायक निकाल.

आठ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध चार सदस्य निवडणुकीतून विजयी तर उर्वरित दोन जागेसाठी 18 जानेवारी ला मतदान.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी पोटनिवडणुकीतील ग्रामपंचायत सदस्यांचे धक्कादायक निकाल लागलेले आहेत. आठ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध चार सदस्य निवडणुकीतून विजयी एका सदस्यांचा निकाल 19 जानेवारीला तर दोन सदस्य यांची निवडणूक 18 जानेवारीला होणार. तांबे वाडी ग्रामपंचायत दोन जागा साठी एकही अर्ज न आल्याने त्या दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.
माळशिरस चे तहसीलदार जगदीश निंबाळकर नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्याच्या निवडणूका निर्भय व पारदर्शक पार पडलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या आठ जागांवर बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांची निवड झालेली आहे. त्यामध्ये चाकोरे, जांबुड, यशवंतनगर, शिंदेवाडी, वेळापूर, उघडेवाडी, कण्हेर ,कारूंडे अशा गावातील ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झालेले आहेत. अटीतटीच्या निवडणुकीमध्ये मेडद ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 5 मध्ये नाथाआबा भानुदास लवटे पाटील 381 तर नवनाथ महादेव जगताप यांना 345 मते पडलेले आहेत. भांबुर्डी प्रभाग क्रमांक 5 कोमल संतोष वाघमोडे 278 तर रुक्मिणी मारुती वाघमोडे 272 दोन्ही ग्रामपंचायत साठी निवडणूक निर्णय अधिकारी एस.टी. चव्हाण यांनी काम पाहिले. गुरसाळे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 5 अर्जुन हनुमंत पवार 231 केतन शंकर चिकणे 181 सदर ग्रामपंचायतला निवडणूक निर्णय अधिकारी पि.व्ही.सुळ यांनी काम पाहिले पिलीव प्रभाग क्रमांक 1 अनिता अविनाश जेऊरकर 416 ज्योती सचिन भैंस 294 सदर ग्रामपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी एस यु तपासे यांनी काम पाहिले आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत मधील दोन जागा रिक्त होत्या एकही नामनिर्देश पत्रे न आल्याने त्या दोन जागा रिक्त राहिलेल्या आहेत. झिंजेवस्ती ग्रामपंचायत मधील वार्ड 3 मधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल 19 जानेवारीला आहे. ओबीसी आरक्षणामुळे संगम झिंजे वस्ती येथील प्रत्येकी एका जागेसाठी दिनांक 18 जानेवारीला मतदान होणार आहे. सदर निवडणुकीची नोटीस 20 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसंभाजी ब्रिगेड माळशिरस तालुकाध्यक्षपदी शिवश्री दिगंबर मिसाळ यांची निवड .
Next articleभांबुर्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीतील कोमल वाघमोडे यांच्या विजयाने राजकीय समीकरणे बदलली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here