माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 5 गावातील 7 जागांसाठी 17 अर्ज दाखल.

निमगाव व कारुंडे एक अर्ज, पिंपरी दहा अर्ज, मांडवे पाच अर्ज तर तांबेवाडी ग्रामपंचायतीच्या दोन जागांकडे उमेदवारांची पाठ

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावातील दोन जागा, तांबेवाडी दोन जागा, निमगाव मगराचे एक जागा, कारुंडे एक जागा, मांडवे एक जागा, अशा पाच ग्रामपंचायतीच्या सात जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. दि. 20/05/2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाल्यापासून सात जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल नायब तहसीलदार आशिष सानप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी एस. टी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरीचे आर. पी. जाधव, निमगावचे पोगुलवार, मांडवेचे उदगावे, कारुंडेचे लोखंडे, तांबेवाडीचे गोरे असे तलाठी यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यामध्ये मदत केली.

निमगाव मगराचे या गावातील एका जागेसाठी राणी देविदास साठे व कारुंडे गावातील एका जागेसाठी सचिन दशरथ वाघमोडे यांचे एकमेव अर्ज आलेले असल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पिंपरी गावामध्ये दोन जागेसाठी आप्पासाहेब बबन कर्चे, प्रवीण दादा कर्चे, किसन एकनाथ कर्चे, सुभाष दशरथ कर्चे, लालासाहेब गणपत कर्चे, सरस्वती आनंदराव कर्चे, शुभांगी शंकर कर्चे, वैजयंता विलास कर्चे, ताई शिवाजी कर्चे, शोभा मच्छिंद्र कर्चे असे दोन जागेसाठी दहा उमेदवारी अर्ज आलेले आहेत.

मांडवे गावातील एका जागेसाठी पुष्पाबाई हनुमंत पालवे, अर्चना अमोल पाटील, धनश्री तानाजी पालवे, शोभा नाथा सिद, राजश्री लक्ष्मण पालवे असे पाच उमेदवारी अर्ज आलेले आहेत. तांबेवाडी ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवलेली आहे.

उमेदवारांनी उमेदवारी अर्ज का भरला नाही याच्या मुळाशी जाऊन सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले जाईल. 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. सोमवारी दि. 23/05/2022 रोजी छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याची मुदत 25/05/2022 रोजी आहे.
त्यादिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. मांडवे ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे विशेष लक्ष राहणार आहे. सध्या दोन्ही पार्टीचे आठ आठ सदस्य आहेत. एका सदस्याची पोटनिवडणूक लागलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआ. राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात, वेळापूरच्या शंभू महादेवाच्या नगरीत सुखरूप, काळजी करण्याचे कारण नाही.
Next articleदहिगाव सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी रामचंद्र दशरथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी विनायक मोहन फुले यांची निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here