माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या तयारीचा आढावा

माळशिरस (बारामती झटका)

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे क्रमांक रानिआ/ग्रा.पं.नी./२०२२ प्र.क्र. ०८/कावि-०८ मुंबई दि. ९/११/२०२२ अन्वये माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायती, नव्याने स्थापिक तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण मतदान १,१०,०११ एवढे मतदान होणार आहे.

१) माळशिरस तालुक्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या ३५

२) निवडणुक कामी नियुक्त अधिकारी/कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी १३
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी २६,

३) एकूण मतदान केंद्र (सहाय्यकारी सह) १५९

४) क्षेत्रीय अधिकारी १४

५) दि. १८/१२/२०२२ रोजी होणारे मतदान या कामी नियुक्ती कर्मचारी
केंद्राध्यक्ष १७५
मतदान अधिकारी १ – १७५,
मतदान अधिकारी २ – १७५,
मतदान अधिकारी ३ – १७५,
शिपाई कर्मचारी १७५
एकूण (१०% वाढीव कर्मचारी) ८७५
मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या करिता प्रशिक्षण
अ) प्रथम प्रशिक्षण – स्मृतीभवन, यशवंतनगर, अकलूज, दि. ६/१२/२०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत
ब) दुसरे प्रशिक्षण – अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस अकलूज रोड, ६१ फाटा माळशिरस, दि. १३/१२/२०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत
क) तिसरे प्रशिक्षण – नवीन शासकीय धान्य गोदाम, माळशिरस म्हसवड रोड, माळशिरस, दि. १७/१२/२०२२ रोजी सकाळी १० वाजता

६) संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायती व मतदान केंद्रांची माहिती – निमगाव, वेळापूर, काळमवाडी, तरंगफळ, मेडद

७) दि. १८/१२/२०२२ रोजी होणारे मतदान कामे तयार करण्यात येणारी मतदान यंत्रे – कंट्रोल युनिट १८०, बॅलेट युनिट २४०

८) वाहतूक आराखडा – बसेस १७, क्रुझर १५, जीप ९

९) निवडणूक कामे नामनिर्देशन पत्र स्वीकृती, छाननी, चिन्ह वाटप इत्यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय माळशिरस

१०) मतदान यंत्रे निवडणूक कामे तयार करणे दि. १५/१२/२०२२ रोजी नवीन शासकीय धान्य गोदाम, माळशिरस म्हसवड रोड, माळशिरस, येथे सकाळी १० वाजल्यापासून

११) अ) मतदान साहित्य वाटप – नवीन शासकीय धान्य गोदाम, माळशिरस म्हसवड रोड, माळशिरस, येथे दि. १७/१२/२०२२ रोजी सकाळी १० पासून
ब) मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य जमा करून घेणे – नवीन शासकीय धान्य गोदाम, माळशिरस म्हसवड रोड, माळशिरस येथे दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान संपल्यानंतर

१२) मतदान पूर्वी व मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रे ठेवणेकामी सुरक्षा कक्ष – नवीन शासकीय धान्य गोदाम, माळशिरस म्हसवड रोड, माळशिरस

१३) मतमोजणी ठिकाण – नवीन शासकीय धान्य गोदाम, माळशिरस म्हसवड रोड माळशिरस.

याव्यतिरिक्त स्ट्रॉंग रूममध्ये तसेच स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सभोवताली सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तसेच पोलिसांनी पोलीस स्टेशननिहाय वेगवेगळे सेक्टर तयार केलेले आहेत. जेणेकरून सुरक्षा व्यवस्था तसेच मतदान भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleCan I Trust a Paper Writer Service to Write My Essay?
Next articleसदाशिवनगर येथे वीरकुमार दोशी यांना थेट जनतेतील सरपंच पदासाठी वाढता पाठिंबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here