माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतची मासिक मीटिंग पोलीस बंदोबस्तात ग्रामसभेला एसआरपी किंवा मिलिटरी मागविणार का ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ग्रामपंचायत सदस्याचा घेतला धसका का ? पोलीस बाळाचा वापर करून बेकायदेशीर व नियमबाह्य कारभार करण्याचा उद्देश आहे का ?, असा ग्रामस्थांना प्रश्न पडलेला आहे.

वेळापूर ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी ग्रामपंचायतची मासिक सभा दि. 27/02/2023 रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी आयोजित केलेली होती. सदरच्या मासिक मिटींगला वेळापूर पोलीस स्टेशन येथे ग्रामसेवक एस. जी. बनकर व थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच मोहन भाकरे यांनी पत्र देऊन पोलीस कर्मचारी यांना सभेच्या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे वेळापूर पोलीस स्टेशन येथील तीन कर्मचारी पिसेवाडी ग्रामपंचायतमध्ये ठरलेल्या वेळी उपस्थित होते. माळशिरस तालुक्यात ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग पोलीस बंदोबस्तात घ्यावी लागत आहे, तर ग्रामसभेला एसआरपी किंवा मिलिटरी मागविणार का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिसेवाडी ग्रामपंचायतमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष साहिल आतार बहुमताने ग्रामपंचायत सदस्य झालेले आहेत. ग्रामपंचायतमध्ये बेकायदेशीर व नियमबाह्य कारभारावर सदस्य पदाची सूत्रे हातामध्ये घेतल्यापासून सर्वसामान्य जनतेची व मतदारांची सेवा करण्याचे काम सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ग्रामपंचायत सदस्याचा धसका घेतला आहे का ? पोलीस बळाचा वापर करून बेकायदेशीर व नियमबाह्य कारभार करण्याचा उद्देश आहे का असा ग्रामस्थांना प्रश्न पडलेला आहे.

ग्रामसेवक बनकर यांच्या विरोधात माळशिरस पंचायत समिती येथे तक्रारी करून त्यांच्या कार्यकाळातील दप्तर तपासणी करावी, असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेले आहे. त्यामुळे माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पिसेवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांच्या दप्तराची चौकशी करून पोलीस बंदोबस्तात मासिक मीटिंग घेण्याचे कारण काय, याचा खुलासा घेतील का ?, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला असून मासिक मीटिंग पोलीस बंदोबस्तात घेतलेली असल्याने संघटनेच्या सदस्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार झालेला आहे. सदरच्या प्रकारावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन
Next articleनिरा-देवघरच्या पाण्यासाठी जलनायक शिवराज पुकळे यांच्या संवाद दौऱ्याची सुरूवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here