मुंबई म्हाडाचे कार्यकारी अभियंता भिमराव काळे यांचे जेष्ठ बंधू ह.भ.प. निवृत्ती संभाजी काळे यांच्या दुःखद निधनानंतर काळे परिवाराशी आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील भांब पंचक्रोशीतील जनतेला अध्यात्माचा लळा लावून संभाजी बाबा मंदिराच्या जडणघडणीत सर्वात मोठे योगदान असलेले ह.भ.प. निवृत्ती संभाजी काळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले होते. काळे परिवार यांची सांत्वनपर भेट भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी पळसमंडळ येथील निवास्थानी जावून सांत्वन केले. यावेळी काळे परिवारातील मुंबई म्हाडाचे कार्यकारी अभियंता भीमराव काळे आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते. आमदार राम सातपुते यांच्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, कण्हेर गावचे युवा नेते धर्मराज माने, राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे आदी उपस्थित होते. आ. राम सातपुते यांच्याकडे वरिष्ठांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे परराज्यांमध्ये शिबिरे, मेळावे, व्याख्यान देण्याकरता बाहेरगावी जावे लागत आहे. माळशिरस तालुक्यात आल्यानंतर जनतेच्या सुख-दुःखात आमदार राम सातपुते यांच्या सहभागाने माणुसकीचे दर्शन घडून आत्मीयता निर्माण होत आहे.

संभाजी काळे यांना चार चिरंजीव यापैकी निवृत्ती यांना पहिल्यापासून अध्यात्माची आवड होती. त्यांना दैवी शक्ती प्राप्त असावी. संभाजी बाबा मंदिराच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. भांड व पळसमंडळ पंचक्रोशीत काळे परिवार सर्व क्षेत्रात सुपरिचित आहे. निवृत्ती अध्यात्मक भीमराव मुंबई म्हाडाचे कार्यकारी अभियंता, दुसरे बंधू मुंबई येथे पोलिस प्रशासनात हवालदार, तर तिसरे बंधू गावाकडे शेती करीत असतात. काळे परिवाराची भांड व पळसमंडळ दोन्हीकडे शेत जमीन असल्याने वास्तव्यास आहेत. ह.भ.प. निवृत्ती काळे महाराज यांच्या दुःखद निधनाने अध्यात्मामध्ये पोकळी निर्माण झालेली असून काळे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन पर भेट लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी दिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
