माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण गण व गटांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची माहिती आहे.

आमच्या वाचकांच्या बुद्धीला चालना देण्याकरता निवडणूक प्रक्रिया सुरू होईपर्यंत डोके चालवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध…

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट केलेल्या गावांची नावे आणि गटाचे व गणातील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवार कोण असावा, कोणत्या पक्षाचा अथवा गटाचा असल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य समाविष्ट असलेल्या गावावरून अंदाज काढण्यासाठी वाचकांच्या अंदाज व प्रतिक्रिया लिहिण्यासाठी आमच्या वाचकांसाठी माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होत नाही, तोपर्यंत आमच्या वाचकांच्या बुद्धीला चालना देण्याकरता गण व गट आणि त्यामध्ये असणारे आरक्षण समाविष्ट असणारी गावे सर्व माहिती उपलब्ध केलेली आहे.

दहिगाव 40 जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गटामधील धर्मपुरी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडलेले आहे. गणामध्ये धर्मपुरी, गुरसाळे, हनुमानवाडी, डोंबाळवाडी, शिंदेवाडी, देशमुखवाडी अशी गावे आहेत तर दहिगाव पंचायत समिती सर्वसाधारण आरक्षण पडलेले आहे. गणामध्ये दहिगाव, मोरोची, कारुंडे अशी गावे आहेत.

फोंडशिरस 41 जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारणसाठी आरक्षण झालेला आहे. गटामधील पिरळे पंचायत समिती सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गणात कुरबावी, एकशिव, तांबेवाडी, पिरळे, कळंबोली, बांगर्डे, पळसमंडळ अशी गावे आहेत. फोंडशिरस पंचायत समिती अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव झालेला आहे. गणात फोंडशिरस, मोटेवाडी, तामशिदवाडी, मारकडवाडी, कदमवाडी अशी गावे आहेत.

संग्रामनगर 42 जिल्हा परिषद गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गटामधील तिरवंडी पंचायत समिती सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. गणात कोंडबावी, वटफळी, तिरवंडी, उंबरे दहिगाव, कचरेवाडी, प्रताप नगर, चाकोरे अशी गावे आहेत. संग्रामनगर पंचायत समिती अनुसुचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात संग्रामनगर, आनंदनगर, बागेचीवाडी, गिरझणी अशी गावे आहेत.

यशवंतनगर 43 जिल्हा परिषद सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गटांमधील यशवंतनगर पंचायत समिती सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेले आहे. गणात यशवंतनगर, चौंडेश्वरवाडी अशी गावे आहेत. खंडाळी पंचायत समिती सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले आहे. गणात विजयवाडी विझोरी, पानीव, घुलेनगर, खंडाळी, दत्तनगर, माळेवाडी, अशी गावे आहेत.

माळीनगर 44 जिल्हा परिषद सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गटांमधील माळीनगर पंचायत समिती सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात माळीनगर, सवतगवाण, तांबवे, बिजवडी अशी गावे आहेत. लवंग पंचायत समिती सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात लवंग, वाघोली, वाफेगाव, संगम, बाभूळगाव, गणेशगाव अशी गावे आहेत.

बोरगाव 45 जिल्हा परिषद सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गटांमधील जांभुड पंचायत समिती सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात जांभूड, नेवरे, विठ्ठलवाडी, खळवे, मिरे, उंबरे वेळापूर, कोंढारपट्टा, दसुर अशी गावे आहेत. बोरगाव पंचायत समिती सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात माळखांबी, बोरगाव, उघडेवाडी, बोंडले, तोंडले अशी गावे आहेत.

वेळापूर 46 जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गटातील वेळापूर पंचायत समिती सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गणात फक्त वेळापूर गाव आहे. खुडूस पंचायत समिती सर्वसाधारण साठी आरक्षित झालेला आहे. गणात खुडूस, मोटेवाडी, पिसेवाडी, डोंबाळवाडी, झंजेवाडी अशी गावे आहेत.

मांडवे 47 जिल्हा परिषद सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गटातील मेडद पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात तरंगफळ, गोरडवाडी, येळीव, भांबुर्डी, जाधववाडी, मेडद अशी गावे आहेत. मांडवे पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात मांडवे, सदाशिवनगर, पुरंदावडे अशी गावे आहेत.

कण्हेर 48 जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गटातील गिरवी पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात लोणंद, लोंढे मोहितेवाडी, गिरवी, निटवेवाडी, शिवारवस्ती, पिंपरी, कोथळे अशी गावे आहेत. कण्हेर पंचायत समिती सर्वसाधारण साठी आरक्षित झालेला आहे. गणात इस्लामपूर, कण्हेर, मांडकी, भांब, रेडे, जळभावी अशी गावे आहेत.

तांदुळवाडी 49 जिल्हा परिषद अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गटातील निमगाव पंचायत समिती सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात निमगाव, पठाणवस्ती, चांदापुरी, गारवाड, मगरवाडी अशी गावे आहेत. तांदुळवाडी पंचायत समिती अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण आरक्षित झालेला आहे. गणात तांदुळवाडी, शेंडेचिंच, धानोरे, मळोली, साळमुख अशी गावे आहेत.

पिलीव 50 जिल्हा परिषद सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गटातील पिलीव पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गणात पिलिव, सुळेवाडी, कुसमोड, झिंजेवस्ती अशी गावे आहेत. कोळेगाव पंचायत समिती अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. गणात बचेरी, शिंगोर्णी, काळमवाडी, कोळेगाव, फळवणी अशी गावे आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा. बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल 98 50 10 49 14 व 91 30 10 32 14 या नंबरची संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झाले.
Next articleआठवले साहेबांना द्रोणाचार्य मानून एकलव्याप्रमाणे मरेपर्यंत काम करु – नंदकुमार केंगार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here