माळशिरस ( बारामती झटका )
दसुर ता. माळशिरस येथील पोलीस पाटील राहुल अशोक शिंदे यांचे वडील अशोक मुकुंद शिंदे यांचा दि. २६/०७/२०२१ रोजी खून केल्याबाबत तात्याबा शंकर माने यांचे कुटुंबाविरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम 302 अन्वये वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता. काही आरोपींना अटक झालेली होती. त्यापैकी सिंधुताई तात्याबा माने व सोनाली तात्याबा माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर २०/०९/२०२१ रोजी सुनावणी होऊन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आरोपीतर्फे ॲड. शंकर काटकर व ॲड. मनीषा देवकर-काटकर यांनी काम पाहिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng