माळशिरस तालुक्यातील नगरपंचायत निवडणुकीत दोन अंकी मतदानाचा आकडा न गाठलेले उमेदवार

माळशिरस, नातेपुते आणि महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत कमी मते पडलेले उमेदवार.

माळशिरस (बारामती झटका)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहीत असताना घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. त्यामध्ये गरीब आणि श्रीमंत भेदभाव न करता सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. घटनेप्रमाणे निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया पूर्ण करत असते. कोणत्याही प्रभागांमध्ये कोणत्याही उमेदवारांना उभा राहण्याचा अधिकार आहे. काही वेळेला प्रभाग सोडून उमेदवार उभे राहिल्यानंतर मतदारांकडून प्रतिसाद मिळतोच असे नाही, काही वेळेला प्रभागात मतदान नसल्याने एकही मत उमेदवारांना पडत नाही किंवा अल्प मत पडतात. नगरपंचायतच्या अटीतटीच्या निवडणुकीत अनेक उमेदवार प्रभाग सोडून निवडून आलेले आहेत तर काही प्रभागातील व प्रभागाबाहेरील उमेदवारांना मतदारांनी मतदान केलेले नाही.

माळशिरस तालुक्यातील माळशिरससह नातेपुते आणि महाळुंग-श्रीपुर येथील नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काही उमेदवार भरघोस मतांनी जिंकले तर काही उमेदवारांना दोन अंकी मतदान देखील गाठता आले नाही. याची सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे –
माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. ५ मध्ये ८७३ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी थोरात विनोद विठ्ठल यांना ४ मते तर पवळ संजय विठ्ठल यांना ७ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. ६ मध्ये ८५४ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी आंबेडकर काजल विशाल यांना ३ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. ११ मध्ये ९०७ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी शेख जुलेखा अब्दुल लतीफ यांना ३ मते मिळाली आहेत.

महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीतील प्रभाग क्र. ८ मध्ये ६७६ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी शिंदे प्रवीण लक्ष्मण यांना २ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. ११ मध्ये ५७४ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी लांडगे कल्याण लाला यांना ३ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. १५ मध्ये ५६९ मतदारांनी मतदान केले आहे. त्यापैकी आहेरसिंग अभिजीत अविनाश आणि वाघमारे नितीन विश्वंभर यांना प्रत्येकी ३ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. १७ मध्ये ५५४ मतदारांनी मतदान केले आहे. त्यापैकी ननवरे अंबादास अशोक यांना ६ मते मिळाली असून वजाळे सुजितकुमार बबन यांना ३ मते मिळाली आहेत.

नातेपुते नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. ३ मध्ये ४७७ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी सोरटे उत्कर्ष दयानंद यांना ६ तर सोरटे शुभम दीपक यांना २ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. ६ मध्ये ७११ मतदारांनी मतदान केले आहे. त्यापैकी ननवरे प्रदीप रामदास यांना ६ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. ८ मध्ये ४४७ मतदारांनी मतदान केले आहे. या प्रभागातील साळवे शेखर धुमाळ यांना एकही मत मिळाले नाही. प्रभाग क्र. १६ मध्ये ८९१ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी नाचण संजय पांडुरंग यांना एकही मत मिळाले नाही तर लंबाते अमोल काशिनाथ यांना ३ आणि कसबे धवल दुर्योधन यांना ६ मते मिळाली आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये श्री. आबा धाईंजे व सौ.शोभा धाईंजे पती-पत्नी एकाच वेळी नगरपंचायतीच्या सभागृहात.
Next articleमाळशिरसमधील विजय कोणा व्यक्तीचा नव्हे, भाजप पदाधिकाऱ्यांचा मोहिते पाटलांना टोमणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here