माळशिरस तालुक्यातील नाकर्त्या विरोधकांनो शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केल ते सांगा ? शेतकऱ्यांचा सवाल…

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या आंदोलनामुळे त्यावेळेस शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला होता.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार होते. त्यावेळेस नोव्हेंबर २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडली होती. त्यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांनी तहसील ते विधानसभा असे तीव्र आंदोलन केलेले होते.

महाराष्ट्राचे तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या संघर्षामुळे महाराष्ट्रात पुन्हा वीज जोडण्यात आली. तत्कालिन सरकारला माघार घ्यावी लागली होती. त्यावेळेस शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला होता.

आता थकीत वीजबिलांमुळे महावितरणने पुन्हा शेतकऱ्यांची लाईट तोडायचा निर्णय घेतला आहे. आ. राम सातपुतेंचे शेतकऱ्यांची लाईट पुन्हा जोडावी म्हणून शासन दरबारी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

आताच्या विरोधी पक्षाने त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल काहीही प्रयत्न केले नाही, आणि आताही स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी आमदारांचे शेतकऱ्यांसाठी केलेल्या जुन्या आंदोलनांचे व्हीडीओ फिरवत आहेत. हिंमत असेल आणि शेतकऱ्यांसाठी मनात कळवळा असेल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करा. विरोधकांनो तुम्ही काय दिवे लावले ते सर्व जनतेला व शेतकऱ्यांना कळु द्या. असा सूर सामान्य शेतकऱ्यांमधून येत असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस तोडगा काढून शेतकऱ्यांची वीज पूर्ववत होईल, असा विश्वास शेतकऱ्यांना असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशासकीय सवलतींसाठी कोणी बनले बहिरे तर कोणी आंधळे
Next articleजमीन वाटून देत नाही म्हणून मुलांनीच लोखंडी हातोड्याने मोडले पित्याचे दोन्ही पाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here