उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख आणि तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस आणि महाळूंग नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख व तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडत आहेत.नातेपुते व महाळुंग नव्याने निर्माण झालेली नगरपंचायत व जुनी असणारी माळशिरस नगरपंचायत या निवडणुका सुरू आहेत.
सध्या उमेदवारी अर्ज दाखल करून छाननी होऊन उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले असून निवडणूक लढविणार्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली आहे. तिन्ही ठिकाणी निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चोख पद्धतीने काम बजावलेले असल्याने विनातक्रार निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. माळशिरस नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख हे काम पाहत आहेत तर त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सहकार्य करीत आहेत.

नातेपुते नगरपंचायत निवडणुकीसाठी अनिल कारंडे निवडणूक निर्णय अधिकारी तर माधव खांडेकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. महाळुंग नगरपंचायत निवडणुकीसाठी नागेश पाटील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक सात मोहोळ हे काम पाहत आहेत, त्यांना धैर्यशील जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महाळुंग श्रीपुर नगरपंचायत व तुषार देशमुख अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार माळशिरस हे मदत करीत आहेत. नगरपंचायत कर्मचारी व महसूल विभागातील कर्मचारी सहकार्य करीत आहेत.

उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडलेली आहे. प्रशासनाने योग्य नियोजन केलेले असल्याने माळशिरस तालुक्यातील निवडणूका उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडतील, असा विश्वास मतदारांना आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng