माळशिरस तालुक्यातील पाच गावात सात ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.

माळशिरस ( बारामती झटका )

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील २४७० ग्रामपंचायतीच्या रिक्त असणाऱ्या ३२५३ ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायत मधील ४६ ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक लागलेली आहे. त्यापैकी माळशिरस तालुक्यातील पाच ग्रामपंचायतमधील सात ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त झालेल्या पदाची निवडणूक जाहीर झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळून निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. निधन राजीनामा अनर्हता किंवा अन्य कारणाने ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने अध्यक्ष निवडणूक राबविण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

माळशिरसचे तहसीलदार तहसीलदार जगदीश निंबाळकर निवडणुकीची नोटीस गुरुवार दि. ०५/०५/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये नामनिर्देशन सादर करण्याचा शुक्रवार दि. १३/०५/२०२२ ते शुक्रवार दि. २०/०५/२०२२ सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेमध्ये स्वीकारणार आहेत. १४, १५, १६ या तारखेच्या सार्वजनिक सुट्ट्या वगळून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. नामनिर्देश पत्राची छाननी सोमवार दि. २३/०५/२०२२ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस बुधवार दि. २५/०५/२०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. ३ वाजलेनंतर निवडणूक लढवणार यांची यादी जाहीर केली जाईल आहे. रविवार दि. ०५.०६.२०२२ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. सोमवार दि. ०६/०६/२०२२ रोजी तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने ठिकाण व वेळ निश्चित करतील असा प्रोग्रॅम निवडणुकीचा जाहीर झालेला आहे.

माळशिरस तालुक्यातील कारुंडे वार्ड क्रमांक ४ मधील राजीनामा दिल्याने रिक्त झालेली आहे. पिंपरी गावात वार्ड क्रमांक २ व वार्ड क्रमांक ४ अनर्हतामुळे सदस्य रद्द झालेली आहे. निमगाव येथे निधन झाल्याने रिक्त झालेले आहे. मांडवे वार्ड क्रमांक ४ मधील सर्वसाधारण स्त्री या जागेची माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल झालेल्या निकालावरून पोटनिवडणूक लागलेली आहे.

माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी निवडणुकीचे कामकाज पाहणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या जन्मदिनी सतिशतात्या ढेकळेंनी केली पाण्याची सोय
Next articleशेतकर्‍यांसोबत चर्चा करून भुमिका स्पष्ट करणार, तालुका आढावा बैठकीत स्वाभिमानीचा निर्णय…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here