माळशिरस तालुक्यातील फोंडशिरसला 93 लाख तर उंबरे दहेगावला 24 लाख रुपयाचा निधी जनसुविधा योजनेमधून मंजूर.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे आदेशाने जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशआबा पालवे पाटील यांच्या प्रयत्नाला यश.

फोंडशिरस ( बारामती झटका )

महा विकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तामामा भरणे यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशआबा पालवे पाटील यांच्या प्रयत्नातून व विनंतीनुसार रक्कम
फोंडशिरस ग्रामपंचायतीसाठी रुपये ९३.०० लाख व उंबरे दहिगाव ग्रामपंचायतीसाठी 24.00 लाख एवढ्या भरघोस निधीस फोंडशिरस व उंबरे दहिगाव ग्रामपंचायत साठी मंजूरी चे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी दिले आहेत, फोंडशिरस ग्रामपंचायतीसाठी

जनसुविधा योजना मधुन :-
१.) फोंडशिरस मागासवर्गीय स्मशानभूमी सुशोभीकरण रु.६.०० लाख रुपये.
२.) मुस्लीम दफनभूमी पेव्हींग/पेवर ब्लॉक बसवणे रक्कम रुपये ३.०० लाख फक्त.
३.)फोंडशिरस बांगार्डे रोड ते हणुमंत गायकवाड वस्ती रस्ता करणे र.५.०० लाख रुपये.
४.) फोंडशिरस इरीगेशन टाकी(Tank ) रोड ते शिवदास शेंडे वस्ती रस्ता रक्कम ५.०० लाख रुपये.

नागरी सुविधा योजना :-
१.) शेंढे मळा ते अणिल जगन्नाथ गोरे वस्ती रस्ता करणे रक्कम ५ लाख रुपये
२.) विशाल शिंदे वस्ती ते रुपनवर वस्ती रस्ता रक्कम ५.०० रुपये.
डि.पी.डी.सी. :-
१.) फोंडशिरस पिरळे रोड ते शेंडे मळा रस्ता डांबरीकरण करणे ग्रामा नं.३८६, लांबी १.६० कि.मी. रक्कम २०.०० लाख रुपये.
२.) प्रजिमा ९६ फोंडशिरस ते पेडकर मळा रस्ता डांबरीकरण करणे ग्रामा नं.६७४ लांबी २ कि.मी. रक्कम २५.०० लाख रुपये.
३.) फोंडशिरस कुचेकर वस्ती ग्रामा २१३ ते ग्रामा १७४ रक्कम ९.०० लाख रुपये.
‘क’ वर्गातून
१.) बाणलिंग मंदिर फोंडशिरस येथे सुशोभीकरण करण्यासाठी रक्कम १०.०० लाख रुपये.

उंबरे (दहिगांव) ग्रामपंचायतीसाठी रुपये २४.०० लाख एवढ्या भरघोस निधी मंजूरीचे आदेश दिले,

जनसुविधा योजना मधुन :-
१.) उंबरे दहिगांव स्मशानभूमी पेव्हींग/पेवर ब्लॉक व सुशोभीकरण रु.३.०० लाख रुपये.
२.) उंबरे दहिगांव मुस्लीम दफनभूमी कंपाऊंड करणे रक्कम रुपये ३.०० लाख फक्त.
डि.पी.डी.सी. :-
१.) ग्रामा नं.४१४ उंबरे दहिगांव ते सदाशिवनगर खडिकरण रक्कम ५.०० लाख रुपये.
२.) उंबरे दहिगांव ते इनामदार वस्ती ग्रामा नं.२०४ डांबरीकरण करणे रक्कम ५.०० लाख रुपये.
‘क’ वर्गातून
१.) महादेव मंदिर श्रीनाथ मंदिर रस्ता (Concrite) करणे रक्कम ३.०० लाख रुपये. २.महादेव मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी रक्कम ५.०० लाख रुपये. अशा विविध विकास कामांसाठी ग्रामपंचायत यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशआबा पालवे पाटील यांच्या पत्राचा पाठपुरावा करून फोंडशिरस व उंबरे दहीगाव गावातील अनेक दिवसाचे प्रलंबित विकास कामांचे प्रश्न सोडवलेले असल्याने दोन्ही गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबारामती येथील महिला रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न
Next articleमोहिते-पाटील यांच्या सहकारी संस्थावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here