माळशिरस तालुक्यातील भाजपच्यावतीने पिसेवाडीचे नूतन ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार यांचा सन्मान संपन्न.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान संपन्न झाला.

विझोरी ( बारामती झटका )

पिसेवाडी ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष युवानेते साहिल आतार यांनी दैदीप्यमान विजय संपादन करून नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य झाल्याबद्दल माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्यावतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सन्मानावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, भाजपा संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर, समाधान काळे, तेजस भाकरे, अहिल पठाण, दादासाहेब वाघंबरे, बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील भाजपच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज येथे विरविजय चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन – श्रीराज माने पाटील
Next articleमाळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य हनुमंतराव लावंड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here