माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांच्या निलंबनास सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडलेले बारा आमदार यांना गोंधळ घातल्या कारणावरून निलंबित केले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द केलेले आहे. त्या बारा आमदारांमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांचाही समावेश होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून बारा आमदार यांचे समर्थनार्थ माळशिरस येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांना पेढे भरवून निर्णयाचे स्वागत केले. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा सहप्रभारी के.के. पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, युवा नेते आकाश सावंत, भाजपचे तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, तालुका उपाध्यक्ष व डोंबाळवाडीचे सरपंच पिंटूशेठ माने, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अजित वाघ आदी उपस्थित होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.

बारा आमदारांमध्ये अशिष शेलार गिरीश महाजन, अतुल भातखळकर डॉक्टर संजय कुटे, जयकुमार रावळ ,नारायण कुचे, पराग आळवणी, अभिमन्यू पवार, योगेश सागर, हरीश पिंपळे, भांगडिया यांच्यासमवेत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचाही समावेश होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article…अखेर भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने केले रद्द
Next article….अखेर खुडूस गावठाण व परिसराचा सिंगल फेजचा प्रश्न माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here