आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे गटबाजीमुळे बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
कर्जत जामखेड चे कर्तव्यदक्ष युवा आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 3/ 11 /20 21 रोजी सकाळी दहा वाजता माळशिरस पोलीस स्टेशन जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटांची नावे नसल्याने ऐन दिवाळीत दुपळीचे दर्शन जनतेला पहावयास मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचे काटे गटबाजीमुळे बिघडण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.
सदर मेळाव्यास जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे पाटील राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक धनंजय साठे, माळशिरस तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने, माळशिरस तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा ऋतुजाताई मोरे, माळशिरस तालुका युती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कीर्ती पालवे, माळशिरस तालुका ओबीसी अध्यक्ष सोमनाथ पिसे, माळशिरस तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अनिकेत काळे या मान्यवरांच्या समवेत अनेक सन्माननीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आगामी काळातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.तरी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख ,आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरस चे माजी सरपंच विकासदादा धाईंजे, माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे, यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिकराव वाघमोडे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अक्षय भांड, बाबा जाधव, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मणराव मगर, ज्येष्ठ नेते धैर्यशीलभाऊ देशमुख, यांच्यासह अनेक लोकसभेच्या वेळी काम केलेले राष्ट्रवादीचे निष्ठावान नेते व कार्यकर्ते यांची उपस्थिती उद्या राहणार का याकडे तालुक्यामध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आलेले आहे. जर दोन गट उद्या मेळाव्यास उपस्थित नसतील तर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे गटबाजीमुळे बिघडले गेल्याने तालुक्यात कमळ फुलण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng