वेळेवर उपस्थीत न राहणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा उपोषण करणार, सामाजिक कार्यकर्ते युवानेते राहुलदादा टिक पाटील यांचा इशारा…
लवंग ( बारामती झटका )
लवंग प्राथमिक आरोग्य केंद्रात मनमानी कारभार चालू आहे. सर्व महिला अधिकारी वर्ग असल्याने पुरूष मंडळीना उद्धट उत्तरे किंवा धमकावणे, दवाखान्यात निवासी परीचारीका हजर नसतात, तर निवासी डाॅक्टर आठवड्यातून एकदा हजर असतात, लवंग गावात आरोग्य सेवक व सिस्टर यांचं लक्ष नाही, कर्मचारी हजेरी लावून इकडे तिकडे फिरत असतात व काही कर्मचारी तर घरी जात असतात, लवंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांचा कित्येक दिवस झाले कोणत्याही प्रकारचा सर्व्हे नाही व कोणत्याही शिबिराचे आयोजन केले जात नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली जात नाही, लोकांना शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली जात नाही, कोणी विचारले की उडवडीची उत्तरे दिली जातात, अशा पद्धतीचा मनमानी कारभार असल्याने गावातील लोकांची गैरसोय होत आहे. या सर्वांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वेळोवेळी याबाबत माहिती दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते युवानेते राहुलदादा टिक पाटील यांनी दिली आहे.
येणाऱ्या पंधरा दिवसांत जर प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी वेळेवर उपस्थित राहिले नाही आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर युवा नेते राहुलदादा टिक-पाटील व लवंग येथील युवक उपोषण करणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng