अकलूज ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीसाठी पात्र असणारे सोसायटी 143 आहेत. त्यापैकी 49 सोसायट्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यापैकी 48 सोसायटी बिनविरोध झालेल्या आहेत. एकशिव सोसायटीची निवडणूक झालेली आहे. उर्वरित 94 सेवा सोसायटीपैकी 46 सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
काही सोसायट्यांचे उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत, तर काही सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. 50 सोसायट्या यांच्या प्रारूप यादी अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू आहे. एम. एल. शिंदे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे मार्गदर्शनाखाली एस. व्ही. कोरे, ए. एम. कांबळे, जी. बी. जाधव, डी. पी. राऊत अधिकारी पारदर्शक व सुरळीत सोसायट्यांच्या निवडणुका पार पडत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng