माळशिरस तालुक्यातील स्वयंभू जागृत वश्या मारुती मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार.

आ. रामहरी यांनी सुरू केलेल्या कार्याचा आ. रामभाऊ यांच्याकडून यशस्वी पाठपुरावा. दोघांच्या नावात ” राम “असल्याने ” हनुमान ” भक्त समाधानी

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी व तामसिदवाडी दोन्ही गावाच्या सीमेवर गोरे वस्ती या ठिकाणी स्वयंभू जागृत वश्या मारुती मंदिर आहे सदर मंदिराचे लोकवर्गणीतून मंदिर, सभामंडप, शिखर, पंचवीस ते तीस लाख रुपयाचे हनुमान भक्त असणारे कष्टकरी शेतकरी, कामगार, शेतमजूर यांनी लोकवर्गणी जीर्णोद्धार केलेला आहे. उर्वरित मंदिर परिसर विकास करण्याकरता विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार रामहरी रुपनवर यांनी सदर मंदिराची जिल्हा परिषदेकडे क वर्ग दर्जा देण्यासाठी शिफारस केलेली होती तत्कालीन पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी डिपीसीच्या मीटिंगमध्ये मंजूर केलेले होते. कोरोना व आचारसहिता यामुळे सदर मंदिरास आमदार रामहरी रुपनवर यांना मदत करण्याची धारणा असतानासुद्धा त्यांचा कालावधी संपलेला आला होता माळशिरस विधान सभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडून यशस्वी पाठपुरावा सुरू असल्याने दोन्ही आमदारांच्या नावात राम असल्याने हनुमान भक्त समाधानी आहेत.


वश्या मारुती स्वयंभू मूर्ती असून जागृत देवस्थान आहे पूर्वीच्या काळी जमिनीमध्ये सदरची मूर्ती सापडलेली होती त्यावेळेस गुन्याबा शंकर गोरे, बाबू एकनाथ खुळे, बाबू धोंडी बोराटे, कृष्णा मारकड, यांनी स्वतःचे वर्गणी गोळा करून आठशे रुपये जमा केले होते. सदरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कठड्यावर करून चारी बाजूंनी कुडाच्या भिंती घेतलेल्या होत्या. स्वयंभू व जागृत देवस्थान असल्यामुळे अनेक लोकांना प्रचिती आलेली आहे मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यामध्ये मंदिर, कळस, सभामंडप यासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी शेतमजूर दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करणारे कामगार अशा लोकांनी मंदिराची उभारणी केलेली आहे. जरंडेश्वर येथून दरवर्षी ज्योत आणण्यात येते. चैत्र पौर्णिमा या दिवशी हनुमान जन्मोत्सव दोन दिवसाचा कार्यक्रम असतो गोकुळ अष्टमीला सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असतो. माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रातील नामवंत महाराजांनी आपली किर्तन रुपी सेवा वा केलेले आहे ह भ प निवृत्ती महाराज यांनीसुद्धा किर्तन रुपी सेवा मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये केलेली आहे.


मारकडवाडी व तामशिदवाडी या दोन्ही गावाच्या सीमेवरती गोरे वस्ती याठिकाणी वश्या मारुती स्वयंभू जागृत देवस्थानास माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सौ संस्कृती राम सातपुते यांनी मंदिराच्या सुशोभीकरणास शुभारंभ साडेतीन हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले मारुती मंदिराच्या लगत चार हेक्टर गायरान क्षेत्र आहे याचा मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी चांगला उपयोग होणार आहे. आमदार रामहरी रुपनवर यांनी क वर्ग दर्जा दिलेल्या मंदिराच्या सुशोभीकरणास आमदार राम सातपुते यांनी मंदिराच्या समोर जिल्हा परिषदेच्या डी पी सी मधून तीन लाख रुपये पेविंग ब्लॉक साठी मंजूर केले. जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीताताई संजय मोटे यांनी सौर ऊर्जेचा दिवा दिलेला होता व पाण्याच्या टाकी साठी जिल्हा परिषद मधून दहा लाख रुपये मंजूर केलेले आहेत.

आमदार राम सातपुते यांनी मंदिर परिसर पाहिल्यानंतर जास्त उजेडाची गरज असल्याने आमदार फंडातून हायमास्ट दिवा देऊन दहा लाख रुपये सभामंडपासाठी मंजूर केलेले आहेत. मारुती मंदिर या ठिकाणी छोटे-मोठे धार्मिक कार्यक्रम होत असतात लोकांची अडचण होऊ नये यासाठी आमदार राम सातपुते यांनी सभामंडप साठी दहा लाख निधी दिलेला आहे. पूर्वीच्या काळी मूर्तीची प्रतिस्थापना करणारे चारीही लोक आज हयात नाहीत मात्र सुरू केलेले कार्य आजही गोरेवस्ती व परिसरातील हनुमान भक्त यांनी सुरू ठेवलेले आहे दिवसेंदिवस मंदिर परिसर सुशोभीकरण झाल्यानंतर नैसर्गिक देणगी लाभलेल्या निसर्ग रम्य स्वयंभू, जागृत देवस्थान भविष्यात पर्यटन स्थळ व धार्मिक कार्यक्रमाचे ठिकाण होऊ शकते यासाठी आमदार राम सातपुते यांनी लक्ष दिलेले असल्याने हनुमान भक्तातून समाधान व्यक्त केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशेतकऱ्यांचा नेता रवीकांत तुपकरांची प्रकृती खालावली, शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी पेटवली,
Next articleइंदापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here