ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या गाव निहाय नेमणुका
माळशिरस ( बारामती झटका )
राज्य निवडणूक आयोगाचा आदेश जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे माहे जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 मध्ये मुदत संपलेल्या तसेच मे 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि आयोगाने दि. 29/11/2019 रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या व सर्व ग्रामपंचायती व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत करणेकामी तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभा घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या असल्याचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. यावेळी निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल नायब तहसीलदार आशिष सानप व निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभा घेण्याकरता अधिकाऱ्यांच्या नेमणुका व तारखा, वेळ निश्चित करण्यात आलेल्या आहेत. श्री. पी. व्ही. सूळ मंडळ अधिकारी दहिगाव दि. 05/06/2022 रोजी सकाळी गुरसाळे 11 वा., तांबेवाडी दुपारी 2 वाजता. दि. 06/06/2022 रोजी पळसमंडळ सकाळी 11 वा., श्री. ए. टी. जाधव मंडळ अधिकारी इस्लामपूर दि. 05/06/2022 रोजी चांदापुरी सकाळी 11 वा., पठाणवस्ती दुपारी 2 वा., दि. 06/06/2022 रोजी निमगाव सकाळी 11 वा वा., श्री. एस. टी. चव्हाण मंडळ अधिकारी नातेपुते, दि. 04/06/2022 रोजी मेडद सकाळी 11 वा., उंबरे दहिगाव दुपारी 2 वा., मारकडवाडी दुपारी 4 वा., दि. 06/06/2022 रोजी इस्लामपूर दुपारी 2 वा., श्रीमती एस. एस. दराडे मंडलाधिकारी सदाशिवनगर दि. 05/06/2022 रोजी सदाशिवनगर सकाळी 11 वा., लोंढे मोहितेवाडी दुपारी 2 वा., दि. 06/06/2022 रोजी तामशिदवाडी सकाळी 11 वा., पुरंदावडे दुपारी 2 वा., श्री. एस. यु. तपासे मंडळ अधिकारी पिलीव दि. 05/06/2022 रोजी काळमवाडी सकाळी 11 वा., कोळेगाव दुपारी 2 वा., दि. 06/06/2022 रोजी फळवणी सकाळी 11 वा., श्री. व्ही. ए. रणसुभे मंडळ अधिकारी वेळापूर दि. 04/06/2022 रोजी उघडेवाडी सकाळी 11 वा., दि. 06/06/2022 रोजी वेळापूर सकाळी 11 वा., धानोरे दुपारी 2 वा., श्री. सी. एस. भोसले अकलूज दि. 05/06/2022 रोजी यशवंतनगर सकाळी 11 वाजता चौडेश्वरवाडी दुपारी 2 वा., दि. 06/06/2022 रोजी आनंदनगर सकाळी 11 वा., बागेचीवाडी दुपारी 2 वा., श्री. एस. बी फिरमे मंडळ अधिकारी लवंग दि. 06/06/2022 रोजी वाघोली सकाळी 11 वा., संगम दुपारी 2 वा., श्री. व्ही. टी. लोखंडे मंडळ अधिकारी महाळुंग दि. 04/06/2022 रोजी नेवरे सकाळी 11 वा., दि. 06/06/2022 रोजी जांभुड सकाळी 11 वा., माळेवाडी (बो.) दुपारी 2 वा., श्री. सी. बी. लोखंडे पुरवठा निरीक्षक माळशिरस दि. 05/06/2022 रोजी पानीव सकाळी 11 वा. पिसेवाडी दुपारी 2 वा., दि. 06/06/2022 रोजी खंडाळी दत्तनगर सकाळी 11 वा., श्री. एस. के. खंडागळे मंडळ अधिकारी माळशिरस दि. 06/06/2022 रोजी तरंगफळ सकाळी 11 वा., मोटेवाडी( माळशिरस ) दुपारी 2 वा., श्री. पी. टी. शिंदे अव्वल कारकून तहसील कार्यालय माळशिरस दि. 06/06/2022 रोजी तिरवंडी सकाळी 11 वा., कचरेवाडी दुपारी 2 वा., विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत करून दि. 06/06/2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष ग्रामसभेचा इतिवृत्तांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng