माळशिरस तालुक्यात अनुसूचित जाती जमातीसाठी अच्छे दिन…

आमदार, सभापती, नगराध्यक्ष होण्याचा दुर्मिळ योगायोग.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्रातील 103 नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये नातेपुते नगराध्यक्षपद अनुसूचित जाती जमाती महिलासाठी तर, महाळुंग-श्रीपुर नगराध्यक्षपद अनुसूचित जाती जमाती, सर्वसाधारण असा राखीव झालेला असल्याने माळशिरस तालुक्यात अनुसूचित जाती जमातीसाठी अच्छे दिन आलेले आहेत.

माळशरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष सभापती सौ. शोभाताई साठे यांच्या रूपाने माळशिरस तालुक्यात अनुसूचित जाती जमातीचे आमदार व सभापती आहेत. नगरपंचायत आरक्षणामुळे नातेपुते येथे महिला नगराध्यक्ष होणार तर महाळुंग-श्रीपुर येथे पुरुष किंवा महिला होऊ शकते. माळशिरस नगरपंचायतमध्ये अनुसूचित जातीमध्ये असतानासुद्धा सर्वसाधारण जागेवर सौ. शोभा धाईंजे व श्री. आबा धाईंजे निवडून आलेले आहेत. दोन्ही सुद्धा माळशिरस नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी असल्याने नगराध्यक्षपदाचे दावेदार असू शकतात. जर तसे झाले तर माळशिरस तालुक्यात माळशिरस विधानसभेचे आमदार, माळशिरस पंचायत समिती सभापती, नातेपुते, महाळुंग-श्रीपुर आणि माळशिरस नगराध्यक्ष असे अनुसूचित जाती जमातीचे होणार असल्याने माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीसाठी अच्छे दिन समजले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअभिनेते सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर यांनी माळशिरस तालुक्यातील धाब्यावर जेवणाचा आस्वाद घेतला.
Next article….. अखेर संगनमताने प्रांतधिकारी डॉ. विजय देशमुख व शेतकऱ्यांचा अपहार चव्हाट्यावर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here