ग्रामपंचायत सदस्य 53 बिनविरोध तर 715 निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
22 गावामध्ये समोरासमोर लढत आहे तर उर्वरित 12 गावात 03 ते 06 सरपंच पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यात 35 ग्रामपंचायतीची थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक सुरू आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेवरे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य बिनविरोध झालेले आहेत तर उर्वरित 34 गावांसाठी 88 सरपंच पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत सदस्य 53 बिनविरोध झालेले आहेत तर प्रत्यक्ष 715 ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत संगम व निमगाव या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दोघांनी दोन्हीकडे अर्ज भरलेला आहे. 22 गावांमध्ये समोरासमोर लढत लागलेली आहे तर उर्वरित बारा गावांमध्ये 03 ते 06 सरपंच पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng