Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्यात ३४ ग्रामपंचायतीचे ८०.०२% चुरशीचे मतदान शांततेत पार पडले

सर्वात जास्त मोटेवाडी (माळशिरस), कचरेवाडी आणि तरंगफळ गावात तर सर्वात कमी यशवंतनगर येथे मतदान

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यात थेट जनतेतील सरपंच पदाच्या ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ८०.०२% मतदान झाले. यामध्ये सर्वात जास्त मोटेवाडी (माळशिरस) येथे ९१.४३%, कचरेवाडी येथे ९०.१४% आणि तरंगफळ येथे ९०.७८% एवढे मतदान झाले. तर सर्वात कमी यशवंतनगर येथे ५५.६९% टक्के मतदान झाले. ३४ ग्रामपंचायतींचे चुरशीचे मतदान शांततेत पार पडले.

माळशिरस तालुक्यामध्ये तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक सुरळीत पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते, अकलूज, वेळापूर आणि माळशिरस येथील प्रभारी अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये केंद्राध्यक्ष १७५, मतदान अधिकारी १ – १७५, मतदान अधिकारी २ – १७५, मतदान अधिकारी ३ – १७५, शिपाई कर्मचारी १७५ आदी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी १३६ प्रभागामध्ये पुरुष ५६,६४६, स्त्री ५१,०२३, इतर ३ असे एकूण १०,७,६७२ पैकी पुरूष ४५,९५९, स्त्री ४०,१९६, इतर ३ असे एकूण ८६,१५८ म्हणजेच ८०.०२% मतदान झाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort