सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती.
माळशिरस ( बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार जयवंत धोंडिबा दुधाळ यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ‘राजवीर’ या नूतन वास्तूचा गृहप्रवेश, वास्तुशांती व सत्यनारायण महापूजेचा मुहूर्त शनिवार दि. 07/05/2022 रोजी दुधाळ परिवार यांनी कार्यक्रम घेतलेला होता. सदरच्या कार्यक्रमास वेळात वेळ काढून खास आवर्जून उपस्थितीत सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तानाजीराव पालवे पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक कर्णे, पुरंदावडेचे ज्येष्ठ नेते विलास फरतडे, पत्रकार दत्ताभाऊ ढोबळे, विष्णूभाऊ भोंगळे, बारामती झटका वेब पोर्टल आणि यु ट्यूब चैनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवरांसह मांडवे पंचक्रोशी व तालुक्यातील मान्यवरांसह नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मांडवे पंचक्रोशीत प्रतिकूल परिस्थितीत शेतामध्ये काबाड कष्ट करून समाजामध्ये वेगळी प्रतिष्ठा कायम राखून सौ. रुक्मिणी व श्री. यशवंत धोंडीबा दुधाळ आणि सौ. गिरिजाबाई व श्री. भीमराव धोंडीबा दुधाळ या राम-लक्ष्मणासारख्या असणाऱ्या भावांनी व त्यांच्या धर्मपत्नींनी अफाट कष्टावर आपल्या दरिद्री संसाराचा स्वर्ग बनविलेला आहे. कृषी, शिक्षण, राजकारण या क्षेत्रामध्ये दोघांच्या मुलांनी, नातवांनी उल्लेखनीय कामगिरी करून दुधाळ परिवाराने समाजामध्ये वेगळे नाव निर्माण केलेले आहे.
सौ. रुक्मिणी व श्री. यशवंत धोंडीबा दुधाळ यांना तीन मुले उत्तम, श्रीमंत, संजय, चार मुली तारुबाई कर्णे, हिराबाई जठार, अलका गोरे, संगीता बनकर अशी अपत्य आहेत. उत्तम यांचा विवाह सुरेखा यांच्याशी झालेला आहे. त्यांना एक मुलगा मंगेश आणि तीन मुली विवाहित आहेत. श्रीमंत यांचा विवाह छाया यांच्याशी झालेला आहे. त्यांना दोन मुले जयदीप व करण दोन मुली विवाहित आहेत. संजय यांचा विवाह सुवर्णा यांच्याशी झालेला आहे. त्यांना एक मुलगा प्रणव व मुलगी ऋतुजा आहे.
सौ. गिरिजाबाई व श्री. भीमराव दुधाळ यांना दोन मुले युवराज व राहुल आणि चार मुली छाया अभंग, मंगल राऊत, गिरजा पवार, माया बनकर अशी अपत्ये आहेत. युवराज यांचा विवाह अर्चना यांच्याशी झालेला आहे तर राहुल यांचा सुवर्णा यांच्याशी झालेला आहे. दुधाळ परिवाराने शेती, उद्योग, व्यवसायाबरोबर राजकारणात सुद्धा येऊन जनतेची सेवा केलेली आहे. भीमराव दुधाळ उपसरपंच, राहुल भिमराव दुधाळ सरपंच, उत्तम दुधाळ श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात चीफ अकाउंटंट, युवराज भिमराव दुधाळ व्हाईस चेअरमन, संजय दुधाळ सोलापूर जिल्हा ज्योती क्रांती परिषद अध्यक्ष, संग्रामसिंह विकास सेवा सोसायटी संचालीका सौ. सुरेखा उत्तम दुधाळ अशा अनेक राजकीय पदावर कामे करून जनतेची सेवा केलेली आहे व करण्याचे काम सुरूच आहे.

यशवंत धोंडिबा दुधाळ यांच्या ८६ व्या वर्षानिमित्त ‘राजवीर’ वास्तुचा सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम ठेवलेला होता. सदरच्या कार्यक्रमासाठी मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यासह गणगोत्र गोळा झालेले होते. लेकी, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे सर्व एकत्र आलेले होते. नंदराजाच्या दरबारात गोकुळ अवतरले होते, तसे यशवंत दुधाळ यांच्या वाढदिवसाला मान्यवर व मित्र परिवार नातेवाईकांची खास उपस्थिती होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng