माळशिरस तालुक्यात नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार का ?

माळशिरस तालुक्याला भाजपचे एक खासदार, दोन आमदार तर, राष्ट्रवादीला पालकमंत्री व एक आमदार आहेत.

भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही पक्षात असणारे दोन गट डोकेदुखी ठरणार का ?

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. माळशिरस तालुक्यात माळशिरस नगरपंचायत व नव्याने अस्तित्वात आलेली नातेपुते व महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचा समावेश निवडणुकीत असल्याने माळशिरस तालुक्यातील नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार का ? भाजप व राष्ट्रवादीमधील असणारे दोन गट डोकेदुखी ठरणार का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झालेला आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्हीही पक्षाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांची तालुक्यांमध्ये स्वबळावर लढण्याइतपत ताकद नाही. मात्र, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्वबळावर लढण्याइतकी ताकद आहे.
माळशिरस तालुका हा माढा लोकसभा मतदारसंघात येत आहे. सध्या भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते आहेत, तर माळशिरस तालुक्यातील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेवर आहेत. खासदार व दोन आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे आहेत. माळशिरस तालुक्यातील चौदा गावे असणाऱ्या माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव शिंदे आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व माढा मतदार संघाचे आमदार बबनराव शिंदे राष्ट्रवादीचे आहेत.
माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीची माळशिरस पंचायत समितीवर सत्ता आहे. तालुक्यामध्ये अनेक संस्थांवर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायती, सोसायटी ताब्यात आहेत. भाजपचे तालुक्यात वर्चस्व असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर नातेपुते, माळशिरस, महाळुंग श्रीपुर या नगरपंचायती स्वबळावर लढविण्यास काहीही हरकत राहणार नाही. सर्व भाजपच्या ताब्यात असताना स्वबळावर निवडणूक न लढविल्यास राज्य व केंद्रीय स्तरावरील नेत्यांना खासदार व आमदार नगरपंचायतीसाठी कोणत्या तोंडाने निधी व विकासकामे मागणार असाही प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये निर्माण होत आहे. पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनीही माळशिरस तालुक्यात विकास कामे व निधी मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. बबनराव शिंदे यांनी 14 गावात येणाऱ्या महाळुंग श्रीपुर गावात विकास कामे व निधी दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवण्याची ताकद निर्माण झालेली आहे. इतर पक्ष कोणतीही भूमिका घेऊ शकतात मात्र, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार का ? दोन्ही पक्षातील असणारे दोन गट डोकेदुखी ठरणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रो.डॉ. सुभाष वाघमारे यांची सामाजिक संदेश देणारी कविता…
Next articleजांभूड येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पहिले बक्षीस ५१ हजार रुपये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here