माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे पंढरपूर डेपोची स्वारगेट-पुणे-पंढरपूर शिवशाही बस क्रमांक MH 14 GU 3114 या बसच्या पाठीमागील टायरने पेट घेतला. वास व धूरावरून चालक काशीम मुलाणी यांनी प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेऊन गाडीमधील अग्निशामकाने टायर विझवला त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

पंढरपूर डेपोची स्वारगेट-पुणे-पंढरपूर शिवशाही गाडी दुपारी १२ वा. पुणे येथून निघाली होती. पालखी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे रस्ता जागोजागी करण्याचे काम सुरू आहे. त्यात आजचा दिवस लग्न दिवस असल्याने रस्त्यावर वाहनांची रहदारी आहे. साडेपाच वाजता पंढरपूर येथे पोहोचणार्या शिवशाही बसच्या सव्वा पाच वाजता सदाशिवनगर येथे पाठीमागच्या टायरने अचानक पेट घेतलेला होता. गाडीमध्ये ३० प्रवासी प्रवास करीत होते. गाडीचे चालक काशीम मुलाणी व वाहक टी. टी. कोळी यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून अग्निशामकने टायरच्या आग लागलेल्या जागेच्या ठिकाणची आग आटोक्यात आणली.
बस मधील प्रवाशांना सुरक्षित उतरून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसऱ्या बसमध्ये बसवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवशाही बसचे चालक व वाहक यांचे कौतुक सदाशिवनगर पंचक्रोशीतील नागरिक व बसमधील प्रवाशांनी केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng