माळशिरस तालुक्यात भाजपमध्ये मोहिते-पाटील गट जोमात जुना भाजप गट कोमात अशी अवस्था नगरपंचायत निवडणुकीत झाली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोहिते-पाटील यांच्या नगरपंचायतच्या निर्णयाचे समर्थन केल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती चिन्हावर का ? आघाडी


माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये मोहिते पाटील यांनी प्रवेश केलेला होता त्यावेळेस भाजपमध्ये जुना गट सक्रिय होता त्यामुळे राजकीय वर्तुळात खुर्द भाजप व बुद्रुक भाजप असे बोलले जात होते नगरपंचायत निवडणुकीत मोहिते-पाटील गट जोमात आणि भाजपचा जुना गट कोमात अशी अवस्था नगरपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या सन्मान सोहळ्यात माजी महसूल मंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोहिते पाटील यांच्या नगरपंचायतीच्या स्थानिक आघाडी निर्णयाचे समर्थन करून चाणक्य नीति चे कौतुक केलेले आहे नगरपंचायतीच्या निर्णयाचे समर्थन केल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चिन्हावर का आघाडी असा प्रश्न निर्माण होत आहे.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते माळशिरस महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत ५१ पैकी ३७ भाजप पुरस्कृत नगरसेवकांचे सर्व श्रेय आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि माढा लोकसभा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या संघटन चातुर्याला आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोहिते पाटलांचे कौतुक केले. निवडणुकीला सुरुवात झाली त्यावेळेस मी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुरुवातीला या नगरपंचायतीच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही होतो. परंतु मोहिते-पाटील यांनी स्थानिक राजकारणाचा विचार करून आघाडीस मान्यता दिली. मोहिते-पाटलांचा निर्णय योग्य ठरला आहे, असे उपस्थित भाजप व भाजप पुरस्कृत नगरसेवकांच्या समोर सांगितले.

  कोल्हापूर येथील आयोध्या हॉटेलमध्ये माळशिरस तालुक्यातील महाळुंग- श्रीपुर, माळशिरस, नातेपुते या नगरपंचायतमधील भाजप आणि भाजप पुरस्कृत स्थानिक आघाड्यामधील विजयी नगरसेवकांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील  यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना त्यांनी महत्वपूर्ण वक्तव्य मोहिते-पाटील यांच्या चाणक्य नितीचे केले. सदर कार्यक्रमास आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,  संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, व मोहिते पाटील समर्थक नवनिर्वाचित ३७ नगरसेवक उपस्थित होते.  भाजपमधील नवनिर्वाचित नगरसेवक सोडून जुन्या भाजपचे पदाधिकारी बाळासाहेब सरगर सोडले तर कोणीही नव्हते बाळासाहेब यांच्याकडे माळशिरस नगरपंचायतची प्रभारी जबाबदारी होती. बाळासाहेब सरगर भाजपच्या जुन्या व नव्या गटासोबत नेहमी असतात त्यामुळे जोमात का? कोमात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत कळणार आहे. नगरपंचायत निवडणुकीमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीची सर्व सूत्रे मोहिते पाटील गटाकडे जाण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राजकीय गोटात वर्तवली जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Previous articleमराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या हस्ते “संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा दिनदर्शिका-२०२२” चे प्रकाशन संपन्न
Next articleकारुंडे गावच्या सरपंचपदी बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांची बिनविरोध निवड…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here