माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील गट व पारंपारिक विरोधक तर काही ठिकाणी मोहिते पाटील समर्थक यांच्यात आमने सामने लढत लागलेली आहे.

11 ग्रामपंचायत मधील बिनविरोध 53 सदस्यांमध्ये मोहिते पाटील गटाचे वर्चस्व दिसत आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीची थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. नेवरे ग्रामपंचायत बिनविरोध सरपंच व सदस्य झालेले आहेत बावीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाचे दोनच उमेदवार आमने-सामने उभे आहेत तर बारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तीन ते सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांचा एक गट आहे तालुक्यातील पारंपारिक विरोधक यांचाही गट आहे. मोहिते पाटील गट व पारंपारिक विरोधक यांच्यात सरळ सरळ लढत लागलेली आहे काही ठिकाणी मोहिते पाटील समर्थक एकमेकांच्या आमने-सामने लढत लागलेली आहे. 11 ग्रामपंचायत मध्ये 53 सदस्य बिनविरोध झालेले आहेत त्यामध्ये मोहिते पाटील गटाचे वर्चस्व दिसत आहे.
भाजपमध्ये खुर्द व बुद्रुक गट काही ग्रामपंचायत मध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत तर काही ठिकाणी पारंपारिक गावस्वरूपी एकमेकांचे विरोधक असलेले जरी मोहिते पाटील गटाचे असले तरीसुद्धा आपापसात लढत लागलेली आहे. मोहिते पाटील यांचे कोणत्याच गटाला समर्थन नाही मात्र विजयी सरपंच व सदस्य यांना हार फेटे बांधून स्वागताच्या तयारीत आहेत सध्याच्या राजकीय परिस्थिती व गावातील आपापसातील मतभेद व वादविवाद बरेचसे मिटलेले आहेत त्यामुळे ताना तानी न होता शांततेत व सुरळीत पार पडतील अशी सध्या तरी परिस्थिती आहे. चिन्ह वाटप झालेले आहे उद्यापासून प्रचाराचे शुभारंभ होण्याची शक्यता आहे थेट जनतेतील सरपंच पद असल्याने ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये मरगळ आहे आरक्षित सरपंच असणाऱ्या ठिकाणी मात्र उपसरपंच पदाची फिल्डिंग निवडणुकीआधीच सुरू आहे 18 तारखेला मतदान आहे प्रचारासाठी भरपूर वेळ आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस मधील खंडोबा वस्ती येथील खंडोबा देवाच्या पूर्वीच्या मुर्त्या गाभाऱ्यामध्ये ठेवाव्या – सुमितभाऊ जानकर.
Next articleसदाशिवनगर ग्रामपंचायतचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार विरकुमार दोशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here