माळशिरस तालुक्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता ?

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची भेट शिवसेनेचे बंडखोर आ. शहाजीबापू पाटील व राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी घेतली.

मुंबई ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची मुंबई येथे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील व माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी भेट घेऊन देवेंद्रजी फडवणीस यांचा सन्मान केलेला आहे. राष्ट्रवादी आणि बंडखोर शिवसेना यांनी भाजपचे देवेंद्रजी फडवणीस यांचा सत्कार केलेला असल्याने माळशिरस तालुक्यात राजकीय भूकंप होणार का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झाला आहे.

माळशिरस विधानसभेच्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी निवडणूक लढवलेली होती. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांचा पराभव केलेला होता. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलेले होते. अडीच वर्षानंतर शिवसेनेचे नेते सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार बनवलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भाजप पक्षाला अच्छे दिन आलेले आहेत. राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर मंडळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत. आत्ता उरली सूरलेली सुद्धा छोटे-मोठे नेते व कार्यकर्ते भाजपच्या व एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत.

माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत गेलेले आहेत. त्यामुळे ‘माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला घरघर’ बारामती झटका ने वृत्त प्रसिद्ध केलेले होते. राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या समवेत भेट घेतलेली असल्याने शहाजीबापू यांनी उत्तमराव यांना काय घड्याळ, काय काटा, हीच वेळ आहे, भाजपमध्ये जाण्याची, असा सल्ला दिला कि काय. त्यामुळे शहाजीबापूसह उत्तमराव जानकर भाजपमध्ये जातील की काय, अशी शंका राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केली जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article….अन् डायलिसिस सेंटरचे नाव तात्काळ बदलले
Next articleअसंख्य ग्राहकांच्या मनावर अधिराज्य करणारी साळमुख फाट्याची सुप्रसिद्ध आणि मंगलमूर्ती मिसळ आणि भेळच्या नवीन शाखेचा शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here