माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीला ओहोटी, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत वाढ, अनेक सेल अध्यक्षांसह असंख्य कार्यकर्त्यांचा संघटनेत प्रवेश.

माळशिरस तालुक्यातील शेतकरी संघटनेला अच्छे दिन येणार, भाजपचा विरोधी पक्ष म्हणून शेतकरी संघटना रूपाला येणार.

माळशिरस ( बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल व अनेक पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी माळशिरस तालुक्यात सर्वसामान्य शेतकरी व जनता यांच्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढून न्याय दिलेला आहे. माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओहोटी लागलेली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक सेल अध्यक्षांसह असंख्य कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश करणार आहेत. माळशिरस तालुक्यातील शेतकरी संघटनेला भविष्यात अच्छे दिन येणार, भाजपचा मुख्य विरोधी पक्ष म्हणून शेतकरी संघटना नावारूपाला येईल असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका ओबीसीचे माजी अध्यक्ष सोमनाथ पिसे, राष्ट्रवादीचे सोशल मीडिया प्रमुख विठ्ठल जाधव यांच्यासह असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार होते. त्यावेळेस माळशिरस तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नाकडे जाणीवपूर्वक डोळे झाक केलेली होती. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये तरुणांच्या हाताला काम व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गारवाड येथे होणाऱ्या कॉरिडॉर एमआयडीसीमध्ये राष्ट्रवादीने सरकार असताना लक्ष घालणे गरजेचे होते. व इतर अन्य कारणाने राष्ट्रवादीचे सेल अध्यक्ष यांनी स्वाभिमानीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी व जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल यांच्यासह अनेक सहकाऱ्यांच्या साथीने माळशिरस तालुक्यामध्ये आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम जोमाने करून सर्वसामान्य जनता व शेतकरी यांना दिलासा दिला आहे. तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ मानला जातो मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला घरघर लागलेली असून अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भाजपचा खरा विरोधी पक्ष म्हणून भविष्यात शेतकरी संघटना नावारूपाला येईल, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदिवाळी सुट्टीत चिमुकल्या शाळकरी मुलांनी तयार केल्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती
Next articleछत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वेळापूर चौकातील पुतळे हटवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here