माळशिरस तालुक्यात रोटरी क्लबचे मोफत मधुमेह तपासणी शिबिर उदंड प्रतिसादात संपन्न.

नातेपुते येथे माजी आमदार रामहरी रुपनवर यांची सदिच्छा भेट व मधुमेह तपासणी शिबिरात सहभाग.

नातेपुते ( बारामती झटका )

जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरी क्लब, अकलूज यांच्या रोटरी इंडिया सोसायटी ऑफ डायबिटिक इंडिया अंतर्गत माळशिरस तालुक्यात, अकलूज येथे नवीन बस स्टॅन्ड, प्रतापसिंह चौक, जुने एसटी स्टँड, वेळापूर, श्रीपुर, माळीनगर, माळशिरस, नातेपुते या ठिकाणी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. नातेपुते येथील शिबिरामध्ये विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनवर यांनी सदिच्छा भेट देऊन मधुमेह तपासणी शिबिरामध्ये सहभाग घेऊन रोटरी क्लबच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
नातेपुते येथे हॉटेल पाहुणचारचे मालक संतोषमालक काळे यांनी सदर शिबिरास जागा उपलब्ध करून दिली.

या शिबिराच्या ठिकाणी बबनराव शेंडगे, केतन बोरावके, दत्तात्रेय नलवडे, सुनील राऊत, संतोष राऊत, मनीषा राऊत, विवेक राउत आदी मान्यवरांनी भेटी दिल्या. दिवसभरात पाचशे तपासणीचे उद्दिष्ट होते परंतु, दुपारी तीन वाजेपर्यंतच ५३३ नागरिकांनी मोफत मधुमेह तपासणी शिबिरामध्ये सहभाग नोंदविला. सदरच्या शिबिरामध्ये १० ते १५ टक्के साखर असलेले पेशंट आढळून आलेले आहेत. त्यापैकी दोन टक्के लोकांचे उपचार सुरू आहेत. ५३३ पैकी साधारण ५० जणांना या शिबिरामुळे योग्य वेळी पुढील उपचार करता येणार आहे. या उपक्रमासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकलचे संचालक यादव सर, आडत सर यांचे सहकार्य लाभले. नातेपुते येथील शिबिरात सौरभ साठे, शिफा जमादार, आरती खरात, सारिका सोनलकर, गणेश भिताडे आदींनी परिश्रम घेतले.

रोटरी क्लब अकलुज सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस व टेक्नॉलॉजी अँड रिसर्च राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मधुमेह निदान शिबिर दि. २९/०९/२०२१ रोजी प्रकल्पप्रमुख डॉ. बाहुबली दोशी, अध्यक्ष नितीन कुदळे, सचिव गजानन जवंजाळ, विभाग प्रमुख निलेश कुमार आडत, संचालक प्राध्यापक इंद्रजीत यादव आदी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी संपन्न झाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहातपुरी येथील दलितवस्तीत आला नवीन डीपी, ग्रामस्थांमध्ये दिवाळी
Next articleस्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त तीन दिवसांची परिषद संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here