शुभ हस्ते धैर्यशील मोहिते-पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे.
तरंगफळ ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील तरंगफळ ग्रामस्थ यांनी वन विभागाला सहकार्य केलेले असल्याने जास्तीत जास्त वनीकरणाचे क्षेत्र असल्यामुळे पाण्याचे स्तोत्र वाढलेले आहे नेहमीच शासकीय अधिकाऱ्यांशी सलोखा संबंध ठेवून गावचा विकास करत असतात असे प्रतिपादन शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवामृत चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले तरंगफळ चे ज्येष्ठ नेते एडवोकेट शांतीलाल तरंगे यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमांमध्ये बोलताना सांगितले यावेळी अध्यक्षस्थानी तरंगफळ गावचे सरपंच श्री ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे होते.


तरंगफळ येथील एडवोकेट शांतीलाल उत्तमराव तरंगे, महादेव उत्तमराव तरंगे, सौ जिजाबाई महादेव तरंगे, सुहास महादेव तरंगे, गोरख मारुती जानकर यांच्या सोलार कृषी पंप योजने उद्घाटना वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


सोलार कृषी पंपाच्या उद्घाटनानंतर ज्येष्ठ नेते शांतीलाल तरंगे यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे बोलताना धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे धैर्यशील मोहिते पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे यांच्या शुभहस्ते दूध संघाला दूध घालून जास्तीत जास्त दर घेणाऱ्या दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला, कृषी विभागाच्या वतीने सवलतीच्या दरात ज्वारीचे बियाणे बापू आण्णा तरंगे या शेतकरयाला प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनेची माहिती देण्यात आली. पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री पाटील सर यांचासत्कार करण्यात आला महाराष्ट्र शासन वन विभाग यांचे वतीने तरंगफळ मधील सुखदेव तरंगे यांना पन्नास हजार रुपयेचा धनादेशाचे वितरण करण्यात आले त्यांच्या गायीवर तरस प्राण्याने एक महिन्यापूर्वी हल्ला केला होता त्यात गायीचा मृत्यू झाला होता. सोलापूर जिल्हा बँकेचे व्यवस्थापक मा आर एन जाधव यांनी बँकेच्या वतीने चालू असलेल्या योजना ची माहिती दिली त्यामध्ये बिनव्याजी पिक कर्ज थेट पद्धतीने देणे कर्ज मर्यादा पाच लाखापर्यंत असून कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्यांना तीन लाखांपर्यंत झिरो टक्के व्याज दर असेल अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक श्री आर एन जाधव यांनी दिली एग्रीकल्चर कॉलेज सोलापूर विद्यार्थिनी कु शीला महादेव तरंगे या विद्यार्थ्यांनीने तिसरा क्रमांक पटकाविलेल्या बद्दल सत्कार करण्यात आला.


यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड एडवोकेट शांतीलाल तरंगे स्वस्त धान्य दुकानदार संघटना माळशिरस तालूका अध्यक्ष व माजी सरपंच महादेव तरंगे अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर, ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे, वनविभागाचे वनपाल साळुंके साहेब जाधव साहेब जिल्हा बँकेचे व्यवस्थापक शी आर एन जाधव साहेब सिनियर बँक इन्स्पेक्टर यु एम दीक्षित इन्स्पेक्टर बी एम हंगे तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सतीश कोळेकर कृषी सहाय्यक निखिल शिंदे शिवामृत सेंटरचे चेअरमन युवराज नरुटे संकलन अधिकारी श्री दडस साहेब घोगरे साहेब ग्रामसेवक पानसरे भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य बापू गोरड रविराज तरंगे बाजीराव तरंगे शशिकांत साळवे जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक महादेव शेटे श्रीहरी पानसरे सुभाष पाटील रेडनी गोविंद कांबळे प्रदीप तरंगे प्रशांत तरंगे दामोदर कांबळे तुकाराम जानकर माजी चेअरमन बाप्पू अण्णा तरंगे सुजित तरंगे, लोकमत प्रतिनिधी एल.डी.वाघमोडे बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng