माळशिरस तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी निवडीत निकषांचा बोजवारा.

पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी शालेय व्यवस्थापन समित्या बरखास्त करून नियमांचे पालन करून पुनर्स्थापना करावी, मागणीने जोर धरला आहे.


माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी निवड करीत असताना निकषांचा बोजवारा उडालेला आहे. माळशिरस पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शालेय व्यवस्थापन समित्या बरखास्त करून नियमांचे पालन करून पुनर्स्थापना करावी. असे अनेक गावातील शालेय व्यवस्थापन समिती स्थापन झाल्यानंतर बरखास्त कराव्या या मागणीने जोर धरलेला आहे.
माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्या निवडी जाहीर झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी पदाधिकारी जिल्हा परिषद शाळेत पाल्य नसताना पदाधिकारी झालेले आहेत. गावगाड्यातील राजकीय दृष्टिकोण डोळ्यासमोर ठेवून अनेक पुढाऱ्यांनी आपले गोचीड व्यवस्थापन समितीमध्ये सोडलेले आहेत असा आरोप अनेक गावातील पालकांच्या मधून सूर निघत आहे. शालेय व्यवस्थापन समित्या राजकारणी लोकांचा अड्डा बनलेला आहे. खरंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हा विद्यार्थ्यांचा पाया असतो शालेय व्यवस्थापन समिती शाळेमध्ये अनेक सुधारणा करीत असतात जेणेकरून जिल्हा परिषद शाळेमध्ये पालकांनी आपली मुले इंग्लिश मीडियम मध्ये न घालता जिल्हा परिषद मध्ये पाठवावी अशी आदर्श शालेय व्यवस्थापन समिती असावी. ज्यांना शालेय व्यवस्थापन समितीचा अर्थ कळत नाही असेही अर्थहीन लोक पदाधिकारी झालेले आहेत. अनेक शालेय व्यवस्थापन समितीमध्ये स्वतःची मुली दुसऱ्या शाळेत आणि समितीमध्ये पदाधिकारी मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत असे प्रकार झालेले आहेत निवडीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य यांनीसुद्धा वेळप्रसंगी समर्थन दिलेले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी पालकांना निवडीबाबत पूर्वकल्पना न देता बैठक आहे असे सांगून निवडी केलेल्या आहेत .अशी अनेक पालकांची तक्रार आहे त्यासाठी माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी यांनी सदरच्या निवडी रद्द करून नियमाने पुन्हा निवडी उपस्थित सर्व पाल्य असणाऱ्या पालकांच्या समवेत कराव्यात. पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या गटातील निवडीची माहिती घ्यावी. शिक्षण विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शालेय व्यवस्थापन समित्या स्थापन कराव्यात अन्यथा शिक्षण विभागास वेगळ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा सूर पालकांच्या मधून निघत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकण्हेर गावातील पै. कालिदास रुपनवर युवकाने वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी.
Next articleमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here