माळशिरस तालुक्यात स्वीकृत नगरसेवक निवडीच्यावेळी घोडेबाजार होण्याची शक्यता ?

महाळुंग-श्रीपुर, माळशिरस, नातेपुते या तिन्ही नगरपंचायतमध्ये स्वीकृत नगरसेवकांची अडचण.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील नुकत्याच झालेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक यांच्यामधून सुकृत नगरसेवक निवडले जातात. महाळूंग-श्रीपुर, माळशिरस, नातेपुते या तिन्ही नगरपंचायतमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची अडचण झालेली आहे. माळशिरस तालुक्यात स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी घोडेबाजार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.

माळशिरस नगरपंचायतमध्ये दहा नगरसेवक आहेत. भारतीय जनता पार्टी दोन नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन नगरसेवक, महाराष्ट्र विकास आघाडी तीन नगरसेवक, अपक्ष तीन नगरसेवक आहेत. नातेपुते नगरपंचायत मध्ये 11 नगरसेवक जनशक्ती आघाडी ५, नगरी विकास आघाडी ५, तर एक अपक्ष नगरसेवक आहेत. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतमध्ये सहा नगरसेवक राहुल रेडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पाच भिमराव रेडे पाटिल अपक्ष, चार नानासाहेब मुंडफणे अपक्ष, एक भारतीय जनता पार्टी, एक काँग्रेस पक्ष. असे सतरा नगरसेवकांचे पक्षीय बलाबल आहे.

एका स्वीकृत नगरसेवकास सहा नगरसेवक यांची आवश्यकता असते. नातेपुते येथे जनशक्ती आघाडीला दोन स्वीकृत नगरसेवक घेण्यासाठी एका नगरसेवकाची गरज लागत आहे. माळशिरसमध्ये भारतीय जनता पार्टीला दोन स्वीकृत नगरसेवक घेण्यासाठी दोन नगरसेवकांची गरज भासत आहे, महाळुंग-श्रीपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक स्वीकृत नगरसेवक तर भीमराव रेडे पाटील व नानासाहेब मुंडेपुणे अपक्ष गटाचा होऊ शकतो.

नातेपुते येथे अपक्ष नगरसेवक यांच्या हातात सुकृत एका नगरसेवकाची चावी आहे. जनशक्तीचा करायचा का ? नागरी आघाडीचा करायचा. माळशिरसमध्ये राष्ट्रवादी, महाराष्ट्र विकास आघाडी व अपक्ष एकत्र आल्यास स्वीकृत नगरसेवक होऊ शकतो अथवा भारतीय जनता पक्षाने दोन नगरसेवकांची मदत घेतल्यास दोन्ही भाजपचे होऊ शकतात. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत मध्ये एक राष्ट्रवादीचा तर दुसरा भीमराव रेडे पाटील गटाचा का नानासाहेब मुंडफणे गटाचा असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तिन्ही नगरपंचायतमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्यावेळी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या वेळी पक्षातील व आघाडीतील प्रमुख नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक घेण्याचे आश्वासन दिलेले असते. अशावेळी आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी लक्ष्मी दर्शन अथवा नगरसेवकांचा घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleТребования ACID на простом языке Хабр
Next articleकाँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी – ज्ञानेश्वर पंचवाघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here