माळशिरस तालुक्यात 35 गावांमधील मतदारांची दुसऱ्यांदा दिवाळी साजरी होणार.

थेट जनतेतील सरपंच असल्यामुळे चुरशीच्या गावांमध्ये सरपंच पदाच्या उमेदवाराचे थेट दिवाळं निघणार.

माळशिरस तालुक्यातील राजकीय प्रतिष्ठा असणारे, गावांची निवडणूक सरपंच पदाच्या आरक्षणासह निवडणूक कार्यक्रम वाचा.

माळशिरस ( बारामती झटका )

राज्य निवडणूक आयोग माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत नव्याने स्थापित ग्रामपंचायत समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील सार्वत्रिक निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी थेट जनतेतील सरपंच व सदस्य संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस शुक्रवार दि. 18/11/2022 रोजी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. माळशिरस तालुक्यातील राजकीय प्रतिष्ठा असणारे 35 गावांची निवडणूक थेट जनतेतील सरपंच पदाची असल्यामुळे काही दिवसापूर्वी सणांचा राजा दीपावली सण झालेला आहे. निवडणुकीमुळे 35 गावांमधील मतदारांची दुसऱ्यांदा दिवाळी साजरी होणार आहे. थेट जनतेतील सरपंच पद असल्यामुळे चुरशीच्या गावामध्ये सरपंच पदाच्या उमेदवाराचे थेट दिवाळं निघणार आहे.

सोमवार दि. 28/11/2022 ते शुक्रवार दि. 02/12/2022 तारखेला 11 ते 03 या वेळेमध्ये नामनिर्देश पत्र सादर करावयाची आहेत‌. सोमवार दि. 05/12/2022 रोजी सकाळी 11 वा. नामनिर्देश पत्राची छाननी सुरू होणार आहे. बुधवार दि. 07/12 2022 रोजी 03 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दुपारी 03 नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केली जाणार आहेत. रविवार दि. 18/12/2022 रोजी सकाळी 07.30 वाजले पासून सायंकाळी 05.30 पर्यंत मतदान होणार आहे. मंगळवार दि. 20/12/2022 रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. शुक्रवार दि. 23/12/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची आणि सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

असे राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

माळशिरस तालुक्यातील 35 गावांचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवारांचे आरक्षण तिरवंडी सर्वसाधारण, कचरेवाडी सर्वसाधारण स्त्री, मोठेवाडी माळशिरस सर्वसाधारण, तरंगफळ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, इस्लामपूर अनुसूचित जाती, वेळापूर अनुसूचित जाती, उघडेवाडी अनुसूचित जाती स्त्री, धानोरे अनुसूचित जाती स्त्री, बागेवाडी सर्व साधारण, आनंदनगर अनुसूचित जाती, यशवंतनगर अनुसूचित जाती, संगम सर्वसाधारण, जांभूळ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, माळेवाडी बोरगाव सर्वसाधारण स्त्री, नेवरे नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोळेगाव सर्वसाधारण स्त्री, फळवणी अनुसूचित जाती स्त्री, काळमवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, खंडाळी दत्तनगर अनुसूचित जाती स्त्री, सदाशिवनगर सर्व साधारण, पुरंदवडे अनुसूचित जाती स्त्री, लोंढे मोहितेवाडी सर्वसाधारण स्त्री, गुरसाळे अनुसूचित जाती, तांबेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, मेडद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, उंबरे दहीगाव सर्वसाधारण स्त्री, पळसमंडळ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, तामशीदवाडी सर्वसाधारण स्त्री, मारकडवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, चांदापुरी नागरिकांचा मागास प्रवर्ग, पठाणवस्ती सर्वसाधारण, निमगाव अनुसूचित जाती, पानिव अनुसूचित जाती स्त्री, चौंडेश्वरवाडी सर्वसाधारण स्त्री, पिसेवाडी सर्वसाधारण असे आरक्षण आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक या ग्रामपंचायती नंतर होणार असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार संभाव्य गटातील गावांना छुपी आर्थिक रसद पुरवून जिल्हा परिषद व पंचायत समितीची रंगीत तालीम सुद्धा करणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतीन पिढ्यांची खाणारांची जीभ बदलली, मात्र सागर हॉटेलची चव कायम राहिली…
Next articleह.भ.प. गणेश महाराज भगत नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तन होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here