माळशिरस तालुक्याला आमदार व खासदार राम आणि बलराम यांच्या रूपाने लाभलेले आहेत.

माढा लोकसभेचे कार्य तत्पर लोकप्रिय खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांच्या रूपाने लोकप्रतिनिधी लाभलेले आहेत.

माळशिरस ( बारामती झटका )

माढा लोकसभेचे कार्य तत्पर लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या रूपाने लाभलेले लोकप्रतिनिधी माळशिरस तालुक्याला आमदार व खासदार राम आणि बलराम यांच्या रूपाने लाभलेले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्य तत्पर लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांच्या विजयाने पहिल्यांदाच भाजपचे खासदार व आमदार लोकप्रतिनिधी लाभलेले आहे. माळशिरस तालुक्यातील जनतेने दोन्ही लोकप्रतिनिधी यांना जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्या संधीचे त्यांनी सोने केलेले आहे. त्यामुळे मतदार व जनता समाधानी आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या सहकार्याने कार्यतत्पर लोकप्रिय खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कालावधीमध्ये शंभर वर्षापासून प्रलंबित असलेला लोणंद-पंढरपूर रेल्वे मार्ग प्रश्न मार्गी लागलेला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग, आळंदी-पुणे-फलटण-माळशिरस-पंढरपूर व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग देहू-पुणे-बारामती-इंदापूर-अकलूज-पंढरपूर या दोन्ही महामार्गाचे काम अंतिम टप्प्यावर आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील 22 गावांचा अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या निरा देवधर प्रकल्पाला उर्जित अवस्था मिळालेली आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कालावधीमध्ये प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांना वाचा फुटलेली आहे.

माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून सुद्धा त्यांच्या कार्यकालात म्हणावी अशी गती मिळालेली नव्हती. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना वरिष्ठ नेते यांनी ताकद दिलेली आहे. रेल्वे मंडळाच्या विभागीय अध्यक्ष पदी निवड केलेली आहे, जलक्रांती मंत्रालयाच्या सदस्य पदी नेमणूक केलेली आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून कार्यतत्पर लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कालावधीत गती मिळालेली असून महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर लोणंद-पंढरपूर रेल्वे महामार्गाचे व निरा देवधर प्रकल्पाचे काम सुरू होण्याच्या मार्गावर आलेले आहे. त्यामुळे मोठी कामे केलेली असल्याने खासदार बलराम यांच्या रूपाने लाभलेले आहेत .

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघात जनता दरबाराची सुरुवात करून अनेक लोकांचे व्यक्तिगत व सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विद्यमान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, विधान परिषदेचे आमदार व राजकारणातील चाणक्य श्रीकांतजी भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबारामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या अडचणी घेऊन येत होते. त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णांवर मोफत उपचार करून अनेक व्याधींपासून मुक्तता केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विकास वाटेवरून व सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन वाटचाल सुरू आहे.

रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा असे समजून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी अनेक गरीब रुग्णांवर पुणे, मुंबई येथे मोफत उपचार करून सर्व जाती धर्मातील कुटुंबामधील आपला माणूस म्हणून आमदार राम यांनी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये व हृदयात जागा मिळविली आहे. रुग्णसेवेबरोबर शेतकऱ्यांच्या खते बियाणे, लाईट, पाणी, यासाठी रणरणत्या उन्हातही रस्त्यावर उतरून आंदोलने केलेली आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे ऍडमिशन, नोकरी व अडचणी याविषयी राज्यात व राज्या बाहेर सहकार्य केलेले आहे. तालुक्यामध्ये विशेष करून पश्चिम भागात अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या अडचणी सोडविण्याचे काम सुरू आहे. समोरची व्यक्ती कोण आहे, यापेक्षा कामाला महत्त्व देऊन आजपर्यंत कामाचा धडाका सुरू आहे. माळशिरस तालुक्यात जनता दरबाराच्या माध्यमातून रामराज्य आणलेले असल्याने नावातच राम असलेले लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या रूपाने माळशिरस तालुक्याला लोकप्रतिनिधी लाभलेले आहे.

माळशिरस तालुक्यातील सर्व सामान्य जनता खासदार व आमदार यांच्या कामकाजावर समाधानी आहे. लोकप्रतिनिधी यांना राम आणि बलराम याची उपमा जनतेने दिलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articlePay to Have Essay Written For You
Next articleमहाराष्ट्रातील समस्त रुपनवर पाटील परिवार यांच्यावतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here