माळशिरस तालुक्याला श्रीकांतजी भारतीय यांच्या रूपाने तिसरा आमदार मिळाला आहे.

श्रीकांतजी भारतीय यांचा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मनःपूर्वक सन्मान केला.

पडद्यामागील राजकीय चाणक्य विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय पडद्यावर

माळशिरस (बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले प्रशासनातील दांडगा अनुभव असणारे व्यक्तिमत्व श्रीकांतजी भारतीय यांना भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेची उमेदवारी दिलेली असल्याने माळशिरस तालुक्याला श्रीकांतजी भारतीय यांच्या रूपाने तिसरा आमदार मिळालेला आहे.

श्रीकांतजी भारतीय यांची उमेदवारी विधान परिषदेला जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मनपूर्वक शुभेच्छा देऊन सन्मान करून आनंदाने पेढा भरविला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागील राजकीय चाणक्य भूमिका बजावणारे श्रीकांतजी भारतीय विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकीय पडद्यावर आलेले आहेत. माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक नवोदित आमदारांना विधानसभेत निर्णायक मतदान घेऊन लोकप्रतिनिधी करणाऱ्या धुरंदर व मुत्सद्दी नेत्यावर महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी पदावर काम करीत असताना मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारतीय जनता पक्ष वाढीसाठी व नवोदीत तरुण युवकांना आमदार करण्यासाठी रात्रीचा दिवस करीत होते. महाराष्ट्रामध्ये आमदार राम सातपुते, आ. योगेश टिळेकर, सचिन कल्याण शेट्टी, आ. राजाभाऊ राऊत, आ‌. समाधान अवताडे यांच्यासह 50 ते 60 युवकांना आमदार करण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रामध्ये अनेक युवकांना आमदार बनवलेले आहे.

माढा लोकसभा व माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माळशिरस तालुक्यातील जनतेने राजकारणातील चाणक्य श्रीकांतजी भारतीय यांचे काम जवळून पाहिलेले आहे. माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षामध्ये मोहिते पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांची घडी विस्कटू न देण्याचे काम श्रीकांतजी भारतीय यांनी राजकीय कौशल्याने केले होते. भारतीय जनता पक्षाला अपेक्षित नसणारे मतदान सुद्धा श्रीकांतजी भारतीय यांनी घेतलेले होते. माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या वेळी तालुक्यातील अनेक नेते व कार्यकर्त्यांचा जवळून संबंध आलेला होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय चाणक्य म्हणून भूमिका बजावणारे विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकीय पडद्यावर आलेले असल्याने माळशिरस तालुक्याला विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व विधान परिषदेचे आमदार युवानेते रणजितसिंह मोहिते पाटील आणि विधान परिषदेचे नूतन आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्या रूपाने तिसरा आमदार मिळणार आहे.

विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथविधी घेतल्यानंतर महाराष्ट्राची दक्षिण काशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनाला जाण्याअगोदर माळशिरस तालुक्यातील जनतेचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, माळशिरस येथे सन्मान स्वीकारून जावावे अशी माळशिरसकरांची इच्छा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleWhen Does A Small la marquise car Business Get A Tax Refund?
Next articleरत्नाई कृषी महाविद्यालयाचे डॉ. वाय. टी. जाधव यांचा राज्य पुरस्कारांने सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here