माळशिरस नगरपंचायतच्या बिनविरोध राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष सौ ताई वावरे यांचा राष्ट्रवादी भवनमध्ये सन्मान संपन्न.

राष्ट्रवादीचे नेते तुकाराम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष माझी पत्नी बिनविरोध – युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत च्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ ताई सचिन वावरे यांची बिनविरोध नगरपंचायत वर नगरसेविका पदावर निवड झाल्यानंतर माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादीचे नेते तुकाराम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान संपन्न झाला. माळशिरस नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 20 21-22 पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी तसेच अपक्ष उमेदवार उतरले होते.माळशिरस नगरपंचायत प्रभाग क्र. २ सर्वसाधारण जागेसाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.सोमवार दि.10 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,भारतीय जनता पार्टी व अपक्ष उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुकाराम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ. ताई सचिन वावरे बिनविरोध सदस्य झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष सौ ताई सचिन वावरे यांची बिनविरोध नूतन नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते माळशिरस शहरातील संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवन माळशिरस या ठिकाणी नूतन नगरपंचायतीचे नगरसेविका सौ ताई सचिन वावरे यांचा सन्मान करण्यात आला..यावेळी उपस्थित माळशिरस संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख, ज्येष्ठ गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेव देशमुख, नगरसेवक भगवान थोरात,युवा उद्योजक सचिन वावरे, ॲड. प्रवीण वाघमोडे, अशोकदादा देशमुख, शशिकांत साळुंखे, नगरसेवक मारुती उर्फ आप्पासो देशमुख, प्रगतशील बागायतदार पांडुरंग देशमुख, वस्ताद शिवाजीराव देशमुख, सर्जेराव जानकर महादेव वाघमोडे ,अमोल पिसे, शशिकांत साळुंखे,सचिन टेळे,किरण सावंत, सौरभ जमदाडे,रघुनाथ चव्हाण, आण्णा शिंदे, अमोल पिसे, संजय जमदाडे, ओंकार जमदाडे, राजू तांबोळी,अनिल सावंत, पांडुरंग शिंदे, भैय्या धाईंजे तसेच आदी मान्यवर व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांनी सत्काराला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते तुकाराम भाऊ देशमुख यांच्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष बिनविरोध माझ्या पत्नीला नगरसेविका होण्याची संधी मिळालेली आहे भविष्यामध्ये माळशिरस मधील रस्ते वीज लाईट पाणी यांच्या सुविधेसाठी प्रयत्न करणार आहे सर्वांचे आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळीनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप बोरावके तर सचिवपदी रितेश पांढरे यांची फेरनिवड.
Next articleWhich in turn, Only, Really does what is foil in literature Commercial Offense Insurance policy?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here