माळशिरस नगरपंचायतमध्ये स्व. बापूनाना देशमुख व वस्ताद बाजीराव देशमुख यांची विचारधारा एकत्र.


माळशिरस नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष देशमुख होणार असल्याने माळशिरस शहरावर देशमुखशाही अस्तित्वात येणार.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी युगपुरुष बापूनाना देशमुख यांच्या विचाराचा वारसा जपणारे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकारामभाऊ देशमुख आणि पोलादीपुरुष वस्ताद बाजीराव देशमुख यांच्या विचाराचा वारसा जपणारे माळशिरस नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख दोन्ही गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करीत असल्याने माळशिरस नगरपंचायतमध्ये स्वर्गीय बापूनाना देशमुख आणि वस्ताद बाजीराव देशमुख यांची विचारधारा एकत्र आलेली आहे. माळशिरस नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व उपनगराध्यक्ष शिवाजी देशमुख होणार असल्याने माळशिरस शहरावर देशमुखशाही अस्तित्वात येणार असल्याचे मळशिरसकरांमधून बोलले जात आहे.

माळशिरस नगरपंचायत 2021 – 22 पंचवार्षिक निवडणुकीत 17 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे दहा नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन व राष्ट्रवादी पुरस्कृत एक नगरसेवक, महाराष्ट्र विकास आघाडी पुरस्कृत दोन नगरसेवक तर अपक्ष दोन नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. माळशिरस शहरावर धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने नऊ नगरसेवक धनगर समाजाचे आहेत. विशेष म्हणजे चार नगरसेवक देशमुख आडनावाचे आहेत.

माळशिरस शहरावर देशमुख, पाटील, वाघमोडे या तीन आडनावांचे कायम वर्चस्व राहिलेले आहे. तिन्ही आडनावे वेगवेगळी मात्र, मूळ भावभावकी एकच आहे. माळशिरस शहरामध्ये स्वर्गीय बापूनाना देशमुख, आणि वस्ताद बाजीराव देशमुख यांचा राजकारण व समाजकारण करीत असताना सर्वसामान्य जनतेला व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून आलेल्या नागरिकांना दिलासा दिला होता, आधार होता. दोघांची विचारधारा जनहिताची होती. कधीही जनतेच्या हितासाठी एकमेकांनी एकमेकांचा शब्द मोडलेला नव्हता. दोघांची विचारधारा वेगवेगळी होती मात्र समाजाचे हित हा एकच हेतू होता. समाजामध्ये दोघांनाही आदराचे स्थान होते. दोघांच्याही विचारधारेचा धागा पकडून तुकाभाऊ देशमुख गट व आप्पासाहेब देशमुख गट एकत्र येऊन नगरपंचायतमध्ये सत्ता स्थापन करीत आहेत. सर्वसामान्य जनतेला आनंद होत आहे. मात्र काही राजकीय संधिसाधू मंडळींकडून एकत्र दोन गट येणे तर्कवितर्क केले जात आहेत.

माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीत देशमुख नावाला सत्तास्थापनेत न घेता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दोन्हीनी देशमुख गट पूर्वीचे राजकारण व निवडणुकीत झालेली वादावादी त्यामुळे एकत्र येतील असे माळशिरस जनतेलाच नव्हे तर दोन्ही गटाला असे कधी वाटले नसेल. सत्तास्थापनेसाठी भविष्यात एकत्र येऊ असे असताना युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांच्या मध्यस्थीची भूमिका शिष्टाईची ठरली आणि दोन्ही देशमुख गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करीत आहे.

माळशिरस नगरपंचायत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार ताई वावरे यांना बिनविरोध नगरसेवक होण्याचा बहुमान मिळालेला होता. त्यांचा सन्मान भाजपचे आप्पासाहेब देशमुख गट व राष्ट्रवादीचे तुकारामभाऊ देशमुख गट यांनी केलेला होता. बिनविरोध नगरसेविका झालेल्या ताई वावरे, भाजपच्या का राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीच्या वेळी साथ देतील, असा प्रश्न अनेक लोकांना पडलेला होता. तर्कवितर्क केले जात होते भाजपला व राष्ट्रवादीला ताई वावरे आपल्याच आहेत असे वाटत होते आणि तसेच झाले. भाजपचे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख व राष्ट्रवादीचे शिवाजीराव देशमुख यांना मतदान करण्याचा दुर्मिळ योगायोग ताई वावरे यांना आलेला आहे. माळशिरस शहरामध्ये धनगर समाजाचे वर्चस्व असले तरी स्वर्गीय शिवाजीरावदादा वावरे यांचे एक घर आहे. शिवाजीदादा यांनीसुद्धा बापूनाना देशमुख व बाजीराव देशमुख यांच्यावेळी समन्वय ठेवण्यासाठी काम केलेले होते. त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन सचिनआप्पा यांनी तुकाभाऊ देशमुख गट व आप्पासाहेब देशमुख गट दोन्ही देशमुख गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख व दादासाहेब देशमुख आणि वस्ताद विजय देशमुख यांनी साथ दिलेली असल्याने यश आलेले आहे. माळशिरस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येणे माळशिरसच्या जनतेचे फायद्याचे ठरणार आहे. देशमुख दोन्ही गट एकत्र आलेले असल्याने महाराष्ट्रामध्ये माळशिरस नगरपंचायतचा नवा फार्मूला तयार होणार आहे. दि‌ 18 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचा खुडूस ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मान.
Next articleमांडकी येथे ‘शंकररत्न निवास’ या वास्तूचा गृहप्रवेश, सत्यनारायण महापूजा संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here