भाजपचे आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीचे शिवाजीराव देशमुख उपनगराध्यक्ष, नगरपंचायतवर देशमुखशाहीचे वर्चस्व.
माळशिरस (बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2021- 22 साठी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांची बहुमताने निवड झाली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे शिवाजीराव ज्ञानदेव देशमुख व भाजपच्या सौ. पुष्पावती महादेव कोळेकर यांच्यात समोरासमोर लढत लागलेली होती. राष्ट्रवादीचे शिवाजीराव देशमुख यांना 10 मते तर भाजपच्या पुष्पावती कोळेकर यांना सात मते पडलेली आहे.
माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत सतरा सदस्य त्यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे दोन, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष एक, महाराष्ट्र विकास आघाडी दोन आणि अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. भाजपमध्ये तीन गट आहेत त्यापैकी आप्पासाहेब देशमुख यांच्या सोबत भाजपचे पाच नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, राष्ट्रवादी पुरस्कृत एक आणि अपक्ष दोन असे दहा सदस्य यांनी आप्पासाहेब देशमुख यांना नगराध्यक्ष पदासाठी मतदान केलेले होते.
उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी व भाजप आमने-सामने लढत होती. राष्ट्रवादीचे शिवाजीराव देशमुख यांनी भाजपच्या पुष्पाताई कोळेकर यांचा पराभव केलेला आहे. भाजपचे नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष निवडीच्या वेळी एकाही सदस्याची फाटाफूट झाली नाही. दोन्ही वेळेला 10 सदस्यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना मतदान केलेले आहे. पिठासन अधिकारी तथा माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर निवडणुकीचे काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य नगरपंचायतचे मुख्य अधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत नंदोत्सव साजरा केला. माळशिरसमध्ये देशमुखशाही यांनी नगरपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng